esakal | येथे "शिव' शब्द ऐकताच भरते अर्धेपोट ! 
sakal

बोलून बातमी शोधा

 abdul satar

अब्दुल सत्तार यांनी योजनेचे तोंडभरून कौतुक केले आहे. तसेच योजनेच्या नावातील "शिव' या शब्द ऐकूणच अर्धेपोट भरते. असं म्हणत त्यांनी दहा रुपये देऊन शिवाभोजन केंद्रातील शिवाभोजानाचा आस्वाद घेतला. 

येथे "शिव' शब्द ऐकताच भरते अर्धेपोट ! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे ः शिवसेनच्या जाहीरनाम्यानूसार शहरात प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यभरात असलेल्या शिवभोजन थाळीचा शुभारंभ झाला. त्यानुसार धुळे येथे "शिवभोजन' केंद्राच्या उद्‌घाटन प्रसंगी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी योजनेचे तोंडभरून कौतुक केले आहे. तसेच योजनेच्या नावातील "शिव' या शब्द ऐकूणच अर्धेपोट भरते. असं म्हणत त्यांनी दहा रुपये देऊन शिवाभोजन केंद्रातील शिवाभोजानाचा आस्वाद घेतला. 

पुढे बोलतांना सत्तार म्हणाले, की 1999 मध्ये युती सरकार सत्तेवर असतांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दुःखी, कष्टी, गरिबांना पोटभर जेवण मिळावे यासाठी झुणका भाकर योजना सुरू केली होती. आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवभोजन थाळी आणली आहे. मी स्वःत हे जेवणाचा दर्जा बघणार आहे. काही त्रुटी असल्या तर दुरूस्त करायला सांगेन आणि तरीही ऐकले नाही, तर दुसऱ्याला योजनेचे काम दिले जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला. शिवभोजनास प्रत्येक थाळीसाठी सरकार अनुदान देत आहे. त्यामुळे गोरगरिबांनी या योजनेचा लाभ घ्यावा. थाळीत किती अन्न असावे याचे निकष ठरवून देण्यात 
आले आहेत. त्यामुळे चपाती, भाजी, वरण, भात किती असावा याकडे आमचे लक्ष असणार आहे. शिवाय 
जेवण रुचकर आणि उत्कृष्ट असले पाहिजे याची देखील काळजी घेण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. 

 आर्वजून पहा ः कोणी ऐकत नाही...तर राजीनामा द्या ः राष्ट्रवादीसेलतर्फे आंदोलन