Crimesakal
उत्तर महाराष्ट्र
Crime News : लग्न म्हणजे व्यवसाय? धुळ्यात विवाहितांना वधू बनवून लाखोंचा गंडा
Dhule Police Bust Fake Bride Marriage Scam : धुळे पोलिसांनी लग्नाच्या आमिषाखाली लाखोंचा गंडा घालणाऱ्या बनावट नववधू टोळीचा पर्दाफाश करून चार जणांना ताब्यात घेतले.
धुळे: लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. नागपूर येथील संशयित मध्यस्थासह नववधूच्या नावाखाली आलेल्या चौघांना चाळीसगाव रोड पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.