Ladki Bahin Yojana
sakal
धुळे: शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा दरमहा मिळणारा आर्थिक लाभ सातत्याने सुरू ठेवण्यासाठी पात्र महिलांना १८ नोव्हेंबरपूर्वी ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महिला व बालविकास विभागातर्फे सर्व लाभार्थ्यांना तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डेडलाइन चुकवल्यास थेट लाभ थांबणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.