Municipal Election
sakal
धुळे: राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद, नगरपंचायतींच्या निवडणुकांची मंगळवारी (ता. ४) घोषणा केली. यात जिल्ह्यातील शिरपूर, दोंडाईचा, शिंदखेडा आणि पिंपळनेर पालिका क्षेत्रात ५६ प्रभागांतील ९५ जागांसाठी चुरशीची निवडणूक होईल. या घोषणेनंतर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापण्यास सुरवात झाली आहे.