Dhule Municipality News : मनपात ‘ठेकेदार रिप्लेसमेंट गॅरंटी स्कीम'!

Dhule Municipality : प्रशासनाने पुन्हा निविदा काढायची आणि नव्या ठेकेदाराला काम द्यायचे अशी कार्यपद्धती धुळे महापालिकेत सर्रास पाहायला मिळते.
Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporation esakal

Dhule Municipality News : शहरातील एखाद्या कामासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करायची, निविदा काढायची, निविदाधारकाने काम मिळाल्यावर काम सुरू करायचे, पदाधिकारी-प्रशासनाने त्याचा मोठा गाजावाजा करायचा नंतर ठेकेदाराने बिल मिळत नाही म्हणून काम बंद करायचे. मग प्रशासनाने पुन्हा निविदा काढायची आणि नव्या ठेकेदाराला काम द्यायचे अशी कार्यपद्धती धुळे महापालिकेत सर्रास पाहायला मिळते. (Dhule Municipality Searching for new contractor for repair of eleven crore street lamps)

असाच प्रकार आता शहरातील पथदीपांच्याबाबत होताना दिसतो. तब्बल १० कोटी ८२ लाखाचे एलईडी पथदीप बसविल्यानंतर आता बंद पडलेल्या पथदीपांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी नव्याने निविदा मागविण्यात येत आहेत. त्यामुळे ‘नवा भिडू-नवे राज्य' या उक्तीप्रमाणे हा निविदांचा खेळ खेळला जातो का ? असा प्रश्‍न आहे.

संपूर्ण शहरात एलईडी पथदीप बसवून धुळे महानगरात झगमगाट करण्यासाठी १३ कोटी ६५ लाख रुपयांचा डीपीआर मंजूर करण्यात आला. यात पाच वर्ष देखभाल दुरुस्तीदेखील होती. मोठा गाजावाजा करून सत्ताधारी यांनी हे काम सुरू केले.

मे. वल्लभ इलेक्ट्रिकल्स (गुजरात) या कंपनीला हे काम देण्यात आले. काम सुरु देखील झाले. मात्र, पहिल्यापासूनच एलईडी पथदीपांबाबत विरोधी पक्षांसह सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांकडून तक्रारींचा पाढा पाहायला मिळाला. तो सत्ताधारी भाजपचा कार्यकाळ संपल्यानंतरही संपलेला नाही.

१७ हजारांवर एलईडी

ठेकेदाराने नोव्हेंबर २०२३ पर्यंत शहरात १७ हजार ६७७ एलईडी पथदीप बसविल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. बील मिळत नसल्याने मात्र डिसेंबर २०२३ पासून मात्र ठेकेदाराने एलईडी पथदीप बसविण्याचे काम पूर्णपणे बंद केले. परिणामी बंद पथदीपांबाबत तक्रारी वाढल्या आहेत. (latest marathi news)

Dhule Municipal Corporation
Dhule News : मैत्रिणींनो... स्वस्थ, मस्त अन् आनंदाने जगा! : आयुक्त अमिता दगडे-पाटील

जुन्या पथदीपांचा प्रश्‍न

देवपूर व शहरात एकूण ३ हजार ६२८ जुने पथदीप आहेत. हे पथदीप बदलले न गेल्याने बंद पथदीपांच्या तक्रारी वाढल्या आहेत. एलईडी पथदीप बसविणारी कंपनी प्रतिसाद देत नसल्याने आता महापालिका प्रशासनाने या पथदीपांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी नव्याने निविदा मागविण्याचा प्रस्ताव पुढे केला.

६ मार्चच्या प्रशासकीय स्थायी समिती सभेत त्याला मंजूरी देखील मिळाली. त्यामुळे आता या कामासाठी नवीन ठेकेदार येतील व त्यांनाही अर्थातच महापालिकेकडून बिले अदा होतील.

ठेकेदारांची बाजू

विशेष म्हणजे अमुक-तमुक कामासाठी ठेकेदाराला कमी पैसे अदा होतात, एवढ्या कमी पैशात ठेकेदार कामच करू शकत नाही असा युक्तिवाद अधिकाऱ्यांकडून होतो. अर्थात ठेकेदाराला चांगला मोबदला द्या अशी यातून मागणी होते. मुळात जो ठेकेदार निविदा भरतो, त्यालाच हे कळायला हवे. काम घ्यायचे आणि नंतर

Dhule Municipal Corporation
Dhule News : दुग्धविकास प्रकल्पासाठी अर्ज सादर करा : प्रमोद पाटील

परवडत नाही अशी बोंब ठोकायची. याचा अर्थ ठेकेदाराला काहीच कळत नसताना त्याने काम घेतले का ? काम देण्यापूर्वी प्रशासनाने या गोष्टींकडे लक्ष का दिले नाही का ? असाही प्रश्‍न उभा राहतो. मध्येच काम सोडलेल्या ठेकेदारावर नोटीस देण्यापलीकडे प्रशासनाकडून काहीही कारवाई होत नाही.

एलईडी पथदीपांची स्थिती

मंजूर डीपीआर १३.६५ कोटी

ठेकेदाराकडून काम १० कोटी ८२ लाख २८ हजार २१३

बिल अदा ६ कोटी ५९ लाख ७२ हजार ९६८

बिल बाकी ४ कोटी २२ लाख ५५ हजार २४५

एकूण बसविलेले पथदीप १७,६७७

पथदीप बसविणे बाकी ३६२८ (जुने पथदीप

Dhule Municipal Corporation
Dhule News : राऊळनगरचा चेहरामोहरा बदलणार : आमदार रावल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com