Dhule Crime News : 3 लाखांच्या 10 दुचाकी तालुका पोलिसांतर्फे हस्तगत

Dhule Crime News : तालुका पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात मोहाडीतील एका चोरट्याला जेरबंद केले. त्याच्याकडून तीन लाखांच्या चोरीच्या दहा दुचाकी हस्तगत केल्या.
Dhule Police officers and teams present during inspection of seized bikes.
Dhule Police officers and teams present during inspection of seized bikes.esakal

Dhule Crime News : तालुका पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात मोहाडीतील एका चोरट्याला जेरबंद केले. त्याच्याकडून तीन लाखांच्या चोरीच्या दहा दुचाकी हस्तगत केल्या. संशयित चोरट्याची पोलिस कोठडीत रवानगी झाली.

चितोड (ता. धुळे) येथील महेंद्र मोहन बोरसे याची दुचाकी (एमएच १८, सीए १२०५) चोरट्याने ९ फेब्रुवारीला सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान शिरुड चौफुलीवरून लांबविली होती.

याबाबत धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी गुन्ह्याचा तपास ज्ञानदेव काळे यांच्याकडे सोपवून स्वतंत्र पथक तयार केले.

त्यातील सुनील जावरे, ललित खळगे, रवींद्र सोनवणे, सुरेंद्र खांडेकर, राजू पावरा, राहुल देवरे, संदीप गुरव, दीपक मोहिते, योगेश वानखेडे, प्रमोद पाटील.

Dhule Police officers and teams present during inspection of seized bikes.
Pune Crime News : कोंढव्यात मद्यपीकडून पत्नीवर ब्लेडने वार

अमोल कापसे यांनी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास केला.

यात गोपाल देवीदास पाटील (वय ३८, रा. मोहाडी, धुळे) याला अटक केली. त्याच्याकडून महेंद्र बोरसे याच्या दुचाकीसह एकूण तीन लाखांच्या दहा दुचाकी जप्त केल्या. तपासात निष्पन्न संशयिताच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.

Dhule Police officers and teams present during inspection of seized bikes.
Pune Crime News : बाराशे कोटींचे मेफेड्रोन जप्त ; पुण्यातील विश्रांतवाडी, दौंडमधील कुरकुंभ येथे कारवाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com