Dhule Crime News : संशयित गावठी पिस्तुलांसह ताब्यात; धुळ्यातील मिल परिसरात LCB च्या पथकाची कारवाई

Dhule Crime News : शहरातील मिल परिसरातील एका संशयिताला एलसीबी पथकाने दोन गावठी पिस्तुलांसह पारोळा चौफुलीवर जेरबंद केले.
Police officers and team present with issue of action in pistol case
Police officers and team present with issue of action in pistol caseesakal

Dhule Crime News : शहरातील मिल परिसरातील एका संशयिताला एलसीबी पथकाने दोन गावठी पिस्तुलांसह पारोळा चौफुलीवर जेरबंद केले. शंकर बालकिसन रेड्डी (वय २२, रा. विद्युतनगर, धुळे) असे त्याचे नाव आहे.

शंकर रेड्डी देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगून पारोळा चौफुली येथील हनुमान मंदिराजवळील चहाच्या टपरीजवळ येणार असल्याची माहिती एलसीबी पथकाला मिळाली. (Dhule LCB team)

Police officers and team present with issue of action in pistol case
Mumbai Crime News: मालकाच्या जेवणात विष मिसळून नोकराने पळवला 2.50 कोटींचा हिरा अन् दागिने...पण आधार नंबरमुळे झाली फजिती

त्याआधारे शंकर रेड्डीला पारोळा चौफुली येथून बेड्या ठोकल्या. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ८० हजारांचे दोन गावठी पिस्तूल, दोन हजारांचे दोन जिवंत काडतुसे, ५० हजारांची दुचाकी (एमएच १८, सीबी ४४२९) असा एक लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

त्याच्याविरुद्ध आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे.

बाळासाहेब सूर्यवंशी, कैलास दामोदर, संजय पाटील, सुरेश भालेराव, प्रशांत चौधरी, रवीकिरण राठोड, सुशील शेंडे, नीलेश पोद्दार, गुणवंत पाटील, हर्शल चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Police officers and team present with issue of action in pistol case
Mumbai Crime News : मुंबईत धक्कादायक प्रकार! मृतदेहासोबत कुटुंबाने घालवले 10 दिवस; हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com