Dhule Water Shortage : 300 कोटींच्या पाणी योजनेविषयी शिंदखेडा तालुक्यातील जनता अनभिज्ञ

Water Shortage : जलजीवन मिशनअंतर्गत काम सुरु असलेल्या ८५ गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी एप्रिल, मे महिनाअखेर काही गावांना ट्रायलबेसवर तरी उपलब्ध होण्याची आशा होती.
On-going work of 85 village water supply scheme water tank under Jaljeevan Mission near Salve village on Chimthana road.
On-going work of 85 village water supply scheme water tank under Jaljeevan Mission near Salve village on Chimthana road.esakal

Dhule Water Shortage : शिंदखेडा तालुक्यातील ८५ गावांना पिण्याच्या पाण्यासाठी सद्यस्थितीत भीषण पाणीटंचाई असताना ३०० कोटी रुपये खर्चाच्या जलजीवन मिशनअंतर्गत काम सुरु असलेल्या ८५ गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी एप्रिल, मे महिनाअखेर काही गावांना ट्रायलबेसवर तरी उपलब्ध होण्याची आशा होती. परंतु, ज्या जलकुंभातून पाणी सिंचन करून ग्रॅव्हीटीने सोडणार ते जलकुंभाच्या कामासह मुख्यजलवाहिनी व गावांतर्गत जलवाहिनीची कामेही पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक अपूर्ण आहेत. (dhule people of Shindkheda taluka are not aware about 300 crore water scheme marathi news )

डिसेंबर २०२४ अखेर काम पूर्ण करण्याची मुदत असतांना त्या कालावधीत योजना पूर्ण होणार नाही असे कल्याण टोल इन्फ्रा ठेकेदाराच्या निष्क्रीयतेवरून स्पष्ट होते. त्यामुळे पुढील वर्षातही या गावांतील जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. शिंदखेडा तालुक्यातील जनतेसाठी दुष्काळ हा पाचवीलाच पुजलेला आहे. यातून मुक्ती मिळवण्यासाठी या तालुक्यातील जनतेने तिसऱ्यांदा भरभरून मतांचे दान करून आमदार जयकुमार रावल यांना निवडून दिले.(latest marathi news)

On-going work of 85 village water supply scheme water tank under Jaljeevan Mission near Salve village on Chimthana road.
Nashik Water Shortage : पिंपळगाव (वा) ला 29 वर्षानंतर टॅंकर; 5 दिवसाआड पाणी

परंतु, योजनेचे कासवगतीने काम सुरू आहे. योजना कुठून कशी येणार? पाणी दरडोही किती मिळणार, याबाबत गावांना प्रचार व प्रसार झालेला नाही. काम सुरु असलेल्या गावांना कामाचे माहिती फलक लावलेले नाहीत. साईटवर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे अधिकृत शासकीय उपअभियंता, शाखा उपअभियंता उपस्थित राहणे महत्वाचे असताना त्यांच्या गैरहजेरीत निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. तसेच, ३०० कोटी रुपये खर्चाच्या योजनेबाबत अनभिज्ञ असलेल्या जनततेला माहितीसाठी ग्रामसभा घेऊन मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. कारण, येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुकीत हा कळीचा मुद्दा होऊ शकतो.

On-going work of 85 village water supply scheme water tank under Jaljeevan Mission near Salve village on Chimthana road.
Dhule Water Shortage : सोनगीरला पाणीटंचाई..! महिन्यात फक्त तीनदा नळांना पाणी

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com