पेढ्यातून गुंगीचं औषध देत अत्याचार, ब्लॅकमेल करत २ वर्षे संबंध ठेवले अन् ५९ लाख उकळले, मुख्याध्यापकाला अटक

धुळ्यातील देवपूरमधील वलवाडी इथं एका महिलेवर गुंगीचे औषध देत अत्याचार करण्यात आल्याची घटना घडलीय. यानंतर तिला ब्लॅकमेल करत तिच्याकडून ६० लाख उकळल्याची माहिती समोर आलीय. या प्रकरणी मुख्याध्यापकाला अटक केली आहे.
Woman Drugged and Exploited for 2 Years; School Principal Arrested

Woman Drugged and Exploited for 2 Years; School Principal Arrested

Esakal

Updated on

धुळे, ता. १५ : महिलेला पेढ्यातून गुंगीकारक पदार्थ देऊन ती गुंगीत असताना एका संशयिताने तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना देवपूरमधील वलवाडी परिसरात घडली. हा घृणास्पद प्रकार करून त्याचे व्हिडीओ चित्रणही केले व त्याद्वारे महिलेला ब्लॅकमेल केले. तिच्याकडून सुमारे ६० लाख रुपये उकळले. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून संशयिताविरुद्ध पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी संशयिताला अटक केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com