Dhule Crime News : पाचकंदील परिसरात जुगारअड्ड्यावर छापा

Dhule Crime : धुळे शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी (ता. १५) शहरातील पाचकंदील परिसरात जुगारअड्ड्यावर छापा टाकून २० जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोकड व जुगाराची साधनेही जप्त केली.
Crime
Crime esakal

Dhule Crime News : स्थानिक गुन्हे शाखा व धुळे शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी (ता. १५) शहरातील पाचकंदील परिसरात जुगारअड्ड्यावर छापा टाकून २० जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोकड व जुगाराची साधनेही जप्त केली. पाचकंदील परिसरात छुप्या पद्धतीने जुगारअड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली. (Dhule Raids on gambling dens in Pachkandil area)

त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तपास करून कारवाईचे आदेश दिले. त्या अनुषंगाने एलसीबी व शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने पाचकंदील परिसरातील चौधरी मार्केटमध्ये छापा टाकला. तेथून २० संशयितांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून रोकडसह जुगाराची पाने, इतर साधने, मुद्देमाल जप्त केला.

मुख्य संशयित राजेंद्र चौधरी यांच्यासह ताब्यात घेतलेल्या सर्व संशयितांना चौकशीकामी शहर पोलिस ठाण्यात नेले. (latest marathi news)

Crime
Crime News: 3 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करुन हत्या! 14 वर्षांच्या मुलाचं धक्कादायक कृत्य..

पोलिस अधीक्षक धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक हृषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धीरज महाजन, एलसीबीचे योगेश राऊत, श्याम निकम, जितेंद्र भामरे, योगेश साळवे.

हेमंत बोरसे, प्रल्हाद वाघ, शहर पोलिस ठाण्याचे विजय शिरसाट, प्रवीण पाटील, अमित रनमाळे, महेश मोरे, मनीष सोनगिरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Crime
Crime News: लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या कपलची हत्या; पुरुषाच्या मुलाने तर महिलेच्या वडिलांनी मिळून केला खून

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com