धुळे: ‘डीजे’च्या अतिरेकी वापरामुळे समाजातील अनेक घटक अस्वस्थ आहेत. त्यातच ‘डीजे’ बंदीमुळे रोजगार बुडेल, असे कारण पुढे केले जाते. शेतकरीदेखील अस्मानी संकटामुळे उद्ध्वस्त होताना दिसतो. मग त्यांच्यासह अनेकांनी रोजगाराच्या नावाखाली गांजा, गावठी दारू विक्रीची परवानगी मागायची का, असा संतप्त सवाल इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांनी उपस्थित केला.