Dhule ST Department
sakal
धुळे: राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धुळे विभागाने दिवाळीनंतर परतीच्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी केलेल्या नियोजनामुळे एक नवा विक्रम प्रस्थापित केला. रविवारी (ता. २६) विभागाने एकाच दिवशी पुणे शहरासाठी तब्बल ९७ जादा बस आणि मुंबईसाठी १२ जादा बस सोडून महामंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने बसची सोय केली.