Free Textbook Distribution Scheme : शिंदखेडा तालुक्यात विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके

Dhule News : पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या २४९ शाळांतील शासकीय, निमशासकीय विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप शाळेच्या पहिल्या दिवशी करण्यात येणार आहे.
Textbooks
Textbooks esakal

Dhule News : शासनाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत शिंदखेडा तालुक्यातील पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या २४९ शाळांतील शासकीय, निमशासकीय विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप शाळेच्या पहिल्या दिवशी करण्यात येणार आहे. पुस्तकांचा साठा गटसाधन कार्यालयात उपलब्ध झाला असून, पुस्तकवाटप करण्याची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे.

तालुक्यातील केंद्रांना ७ जूनपासून पुस्तके साधन केंद्रातून उपलब्ध होती. केंद्रशाळेने ती पुस्तके तत्काळ संबंधित शाळांना वितरित करावीत त्यामुळे लाभार्थी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी आपल्या वर्गाच्या पुस्तकांचा संच मिळेल, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी डॉ. सी. के. पाटील यांनी दिली. गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत पाठ्यपुस्तकांचे वितरण प्रथम केंद्रस्तरावर करण्यात येऊन नंतर शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात येणार आहे.

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात अभ्यासक्रमाचे पुस्तक मिळायला पाहिजे या दृष्टीने नियोजन केले आहे. पाठ्यपुस्तके लवकरच केंद्रस्तरावर व नंतर शाळाप्रमुखांकडे सोपविण्यात येणार आहेत. शिंदखेडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १६९ शाळा व माध्यमिकच्या १०१ आहेत.

जिल्हा परिषदेच्या १६९ पैकी ६१ शाळा सेमी इंग्रजी माध्यमाच्या असून, यात यंदा अजून नवीन ४१ शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यमाचे अध्यापन सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सेमी इंग्रजी माध्यमाच्या १०२ शाळा, शिंदखेडा तालुक्यात १०१ माध्यमिक शाळा आहेत. त्यात ७९ या अनुदानित असून, एक शाळा शासकीय व उर्वरित १९ स्वयंअर्थसहाय तत्त्वावर सुरू आहेत. (latest marathi news)

Textbooks
Dhule Silver Rate Hike : शोभा वाढविणारी चांदी 94 हजार पार; सोन्याचे दिवस आल्याने दरात मोठी वाढ

शासनाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व शासकीय व निमशासकीय अनुदानित माध्यमिक शाळांमधील पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्यात येतात. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पहिली ते पाचवी या वर्गात १७ हजार २८ विद्यार्थी या योजनेचे लाभार्थी आहेत.

माध्यमिक सहावी ते आठवी या वर्गातील १४ हजार ५९१ विद्यार्थी या योजनेचे लाभार्थी आहेत, तसेच ऊर्दू माध्यमाचे पहिली ते पाचवी या वर्गांसाठी एक हजार १९६, तर सहावी ते आठवी या वर्गांसाठी ५५७ विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके देण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आलेले आहेत. पुस्तके वाटण्यासाठी गटशिक्षणाधिकारी डॉ. सी. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाचे गटसमन्वयक सीजी बोरसे, शिक्षण विस्ताराधिकारी सी. एस. खर्डे प्रयत्न करीत आहेत.

पाठ्यपुस्तक लाभार्थिसंख्या अशी

मराठी माध्यम- १९,५६९, मराठी सेमी- १२,०५१, ऊर्दू- १,७५३. एकूण ३३ हजार ३७३ विद्यार्थ्यांना पुस्तके मिळणार आहेत.

Textbooks
Dhule Lok Sabha Constituency : धुळे लोकसभा मतदारसंघाचा सर्जन कोण?

तालुक्यातील १२ हजार ६१८ विद्यार्थ्यांना गणवेश

महाराष्ट्र शासनाने राज्यातील पहिली ते आठवी या वर्गांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्यात एकच गणवेश असावा असा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून होत आहे. शासनाच्या आर्थिक विकास महामंडळामार्फत राज्यातील विविध बचतगटांना गणवेश तयार करून पुरविण्याचे काम देण्यात आले आहे.

सर्व शासकीय, निमशासकीय जिल्हा परिषद व माध्यमिक शाळेतील विद्यार्थी या योजनेचे लाभार्थी आहेत. तालुक्यात १२ हजार ६१८ विद्यार्थ्यांमध्ये सहा हजार ३६९ मुले, तर सहा हजार २४९ मुली या योजनेचा लाभ घेतील. मराठी माध्यमाचे ११ हजार ६९५, तर ऊर्दू माध्यमाचे ९२३ विद्यार्थी या योजनेचा लाभ घेतील.

शाळा सुरू होण्याच्या दहा ते बारा दिवस शिल्लक असतानादेखील अद्यापही गणवेश गटसाधन केंद्रात उपलब्ध झालेले नाहीत. गटशिक्षणाधिकारी डॉ. सी. के. पाटील यांनी गणवेश उपलब्ध झाल्यानंतर तत्काळ शाळांना वितरित करण्यात येतील, असे नियोजन केले आहे.

Textbooks
Dhule News: पाऊस तोंडावर, नाले मात्र ‘ब्लॉक’च! धुळे शहरातील काही नाल्यांची स्थिती; प्राधान्यक्रमाने नालेसफाईला वेग देण्याची गरज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com