Dhule Unseasonal Rain : दोंडाईचा येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजेचे खांब कोसळले, तारा तुटल्या

Unseasonal Rain : येथे रविवारी (ता. १२) पहाटे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील पाच-सहा ठिकाणी विजेचे खांब कोसळले.
Heavy rain accompanied by strong winds caused a tree to fall in front of the office of the power company
Heavy rain accompanied by strong winds caused a tree to fall in front of the office of the power company, bending power poles on both sides. In the second photograph, a broken pillar in front of Appasaheb Maidan.esakal

Dhule Unseasonal Rain : येथे रविवारी (ता. १२) पहाटे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील पाच-सहा ठिकाणी विजेचे खांब कोसळले. तारा तुटल्या, ठिकठिकाणी झाडेझुडपे उन्मळून पडली. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. घटना भल्या पहाटेची असल्याने कोणतीही हानी झाली नसल्याने अनर्थ टळला आहे. रविवारी रात्री साडेतीनच्या सुमारास अचानक आकाश भरून आले. (Dhule unseasonal Heavy rain at Dondaicha on sunday )

विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला. नागरिकांची झोप उडाली. वादळी वाऱ्यामुळे झाडे, झाडांच्या फांद्या विजेच्या तारांवर कोसळल्याने खांब वाकून पडले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने तारांबळ उडाली.

साडेतीन ते चारपर्यंत अर्धा तास वादळ घोंघावत होते. जोरदार पाऊस होत असल्याचे विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट सुरू होता. शहरात वीजपुरवठा खंडित झाल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले होते. तब्बल सात तास वीजपुरवठा बंद पडला होता. सकाळी अकरानंतर काही भागांत वीजपुरवठा सुरळीत झाला.

वीज कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोरच सेंट्रल बँकेच्या अंगणात छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज मार्गावर वीजतारांवर झाड उन्मळून पडले. दोन्ही बाजूला असलेली विजेचे खांब वाकले आहेत. आप्पासाहेब मैदानावर रोडलगतच्या कॉलनी रोडवर सिमेंटच्या खांबांवरील तारांवर लिंबाच्या झाडाची फांदी वाऱ्यामुळे तुटून पडल्याने खांबाचे तुकडे झाले आहेत. (latest marathi news)

Heavy rain accompanied by strong winds caused a tree to fall in front of the office of the power company
Dhule Unseasonal Rain : वडेल शिवारात मेघगर्जनासह गारपीट

महादेवपुरामध्येही मोठी फांदी खांबावर पडली. तेथे आजूबाजूला रहिवासी घरांची दाट वस्ती आहे. सुदैवाने फांदी गल्लीत कोसळल्याने अनर्थ टळला. हुडको कॉलनीत पाण्याच्या टाकीजवळील खांब वाकला आहे. रोटरी मार्गावर झाडाची फांदी तुटल्याने विजेच्या तारा गुंडाळून गेल्या आहेत. अर्धा तास चाललेल्या चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे.

जोरदार पावसामुळे कॉलनी परिसरात अंडरग्राउंड गटारी नसल्याने मोठमोठे डबके साचले आहेत. पोस्ट ऑफिसच्या जागेवरील झाड कोसळले आहे. केशरानंद पेट्रोलपंपासमोरच्या रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक काही काळ बंद होती. परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे, भुईमूग काढणीला आलेल्या शेंगांचे नुकसान झाले.

''शहरात पाच ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे पडून विजेचे खांब पडले. कोणतीही हानी झाली नाही. खांब बदलविण्याचे काम सुरू केले आहे. लवकर वीजपुरवठा सुरळीत केला जाईल.''-मनोज वाडिले, उपअभियंता, वीज कंपनी, दोंडाईचा

Heavy rain accompanied by strong winds caused a tree to fall in front of the office of the power company
Dhule Unseasonal Rain : अवकाळीने सोळागाव काटवन परिसरावर अवकळा; गारठ्यामुळे पिके सडण्याची भीती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com