Dhule News : महिला आंदोलकांतर्फे मनपाला अल्टिमेटम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule Municipal Corporation

Dhule News : महिला आंदोलकांतर्फे मनपाला अल्टिमेटम

धुळे : महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्यानंतर वलवाडी, भोकरसह विविध कॉलनी परिसरातील रहिवासी निरनिराळ्या समस्यांमुळे त्रस्त आहेत. त्या निवारणार्थ आठड्यात निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा इंदिरा महिला मंडळाने दिला. महापालिकेत महिला आंदोलकांनी आयुक्तांच्या दालनाजवळ निदर्शने केली.

महापालिका प्रशासनाला इंदिरा मंडळाने मंगळवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की महापालिका क्षेत्रात समाविष्ट वलवाडी, भोकर, दैठणकरनगर, श्रमसाफल्य कॉलनी ते सप्तशृंगी कॉलनी, तसेच अनेक कॉलन्यांमध्ये अनेक वर्षांपासून पाणी, रस्ते, गटारी, स्वच्छता व पथदीपांचा प्रश्न जैसे थे आहे. कर भरूनही नागरिक सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. (Dhule Update Suspended as Revenue Assistant Dhule News)

आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

हेही वाचा: Crime News : पुणे मेट्रोच्या साहित्याची चोरी! दीड लाख किंमतीचे साहित्य लंपास

वलवाडीतूनही अधिक करदाते नियमित कर भरतात. तरीही वलवाडीतील श्रमसाफल्य कॉलनीची दुर्दशा झाली आहे. खराब रस्ते, खड्डे त्रासदायक ठरले आहेत. अक्षय कॉलनी, अरुणनगर, अशोकनगर, दोंदे कॉलनी, गणेशनगर, पोलिस कॉलनी, अष्टविनायकनगर, सप्तशृंगी कॉलनी यासह निरनिराळ्या कॉलन्यांमध्ये अशीच समस्या आहे.

त्याकडे महापालिका लक्ष देत नाही. निवडणुकीत उमेदवारांनी दिलेली आश्‍वासने पूर्ण केलेली नाहीत. महापालिकेला मिळणाऱ्या कोट्यवधींच्या निधीतून दहा कोटी या समस्याग्रस्त भागाला दिला जावा. श्रमसाफल्य कॉलनीतील रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी मंडळाच्या अध्यक्षा प्रभा परदेशी, साहेबराव पाटील, हर्षदीप पाटील, हर्षदा पाटील, जयश्री पाटील, जगन्नाथ पाटील, कैलास भदाणे, बापू चौधरी, विमलबाई पाटील आदींनी केली.

हेही वाचा: Nashik News: वारी हीच आम्हासाठी दसरा अन्‌ दिवाळी : भास्कर पवारांच्या फेटेधारी दिंडीने वेधले लक्ष