Dhule Bribe Crime : ग्रामसेविकेने स्वीकारली 15 हजारांची लाच!

Dhule Bribe : चौगाव बुद्रूक (ता. शिंदखेडा) येथील ग्रामसेविका राजबाई पाटील यांनी तक्रारदाराकडे १५ हजार रुपये लाचेची मागणी केली.
Dhule Bribe Crime
Dhule Bribe Crimeesakal

चिमठाणे : चौगाव बुद्रूक (ता. शिंदखेडा) येथील ग्रामसेविका राजबाई पाटील यांनी तक्रारदाराकडे १५ हजार रुपये लाचेची मागणी केली. सोमवारी (ता. १५) दुपारी शिंदखेडा येथील राहत्या घरी लाचेची रक्कम स्वतः स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. शिंदखेडा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (Dhule Village servant accepting bribe of 15 thousand)

चौगाव बुद्रूक येथील तक्रारदार यांनी चौगाव बुद्रुक ग्रामपंचायतीचे १५ व्या वित्त आयोगांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम घेऊन ते काम पूर्ण केले. सदर कामावर झालेल्या खर्चाचे बिल तक्रारदार यांना अदा करण्यात आले होते. तसेच तक्रारदार यांनी मौजे चौगाव बुद्रूक येथे रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम केले असून.

त्या कामाकरिता झालेल्या खर्चाचे बिल त्यांना अदा करण्यात आलेले नव्हते. म्हणून तक्रारदार यांनी सुमारे एक महिन्यापूर्वी ग्रामसेविका राजबाई पाटील यांची भेट घेऊन त्यांनी केलेल्या रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामावर झालेल्या खर्चाचे बिल अदा करण्याची विनंती केली असता, ग्रामसेविका पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे रस्ता काँक्रिटीकरणावर झालेल्या खर्चाचे बिल काढण्याकरिता.

तसेच तक्रारदार यांनी यापूर्वी केलेल्या पेव्हर ब्लॉकच्या कामाचे बिल काढून दिल्याचे मोबदल्यात २५ हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपत विभाग कार्यालयाकडे यासंदर्भात ४ एप्रिलला तक्रार दिली होती.

Dhule Bribe Crime
Nashik Fraud Crime: कारडांसह अशोक कटारिया यांच्यावर उपनगर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा! गाळा विक्री प्रकरणी 99 लाखांची फसवणूक

तक्रारीची पडताळणीदरम्यान ग्रामसेविका पाटील यांनी तक्रारदाराकडे २५ हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती १५ हजार रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले होते. सोमवारी (ता. १५) १५ हजारांची लाच शिंदखेडा येथील राहते घरी स्वतः स्वीकारताना ग्रामसेविका पाटील यांना रंगेहाथ पकडण्यात आले. शिंदखेडा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलिस उपधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत बेंडाळे, निरीक्षक रूपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, संतोष पावरा, प्रवीण मोरे, रामदास बारेला, प्रशांत बागूल, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर व दीपाली सोनवणे या पथकाने केली.

Dhule Bribe Crime
Crime News: दुकानांच्या तोडफोडप्रकरणी २५ ते ३० जणांवर गुन्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com