Dhule Crime News : पतीकडून पत्नीचा हत्याराने खून! धुळ्यात घरगुती वादातून दिवसा घटना

Dhule Crime : कौटुंबिक वादातून पतीने तीक्ष्ण हत्याराने पत्नीच्या गळ्यावर वार करून खून केल्याची घटना शनिवारी (ता. १३) दुपारी दोनच्या सुमारास देवपूरमधील नकाणे रोडवर घडली.
Anita Baisane, Hiraman Baisane
Anita Baisane, Hiraman Baisaneesakal

Dhule Crime : कौटुंबिक वादातून पतीने तीक्ष्ण हत्याराने पत्नीच्या गळ्यावर वार करून खून केल्याची घटना शनिवारी (ता. १३) दुपारी दोनच्या सुमारास देवपूरमधील नकाणे रोडवर घडली. घटनेनंतर पसार होण्याच्या तयारीत असलेल्या संशयित पतीला पोलिसांनी अवघ्या काही वेळातच ताब्यात घेतले. त्याने या प्रकारानंतर विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले. (Dhule Wife killed by husband)

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली. देवपूरमध्ये अनिता हिरा बैसाणे (वय ४०, रा. फुले कॉलनी) वास्तव्यास आहेत. त्या धुणी- भांडी करतात. त्यांच्यात व पती हिरामण वाल्मिक बैसाणे (वय ४९) यांच्यात नेहमी कौटुंबिक वाद होत होते.

शनिवारी दुपारी अनिता बैसाणे या काम करून घरी जात असताना पती हिरामण बैसाणे याने त्यांना पांझरा नदी किनारच्या समांतर रस्त्यावर छत्रपती हॉस्पिटलच्या पाठीमागे अडविले. तसेच मारहाण करुन चाकूने अनिता बैसाणे यांचा गळा चिरला. यात अनिता बैसाणे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर हिरामण बैसाणे याने पळ काढला.

Anita Baisane, Hiraman Baisane
Crime News: ड्रग्जच्या आहारी गेलेल्या मुलाची आईकडून चाकू भोसकून हत्या

नंतर तो जवळच लपून बसला होता. घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. घरगुती वादातून संशयित पती हिरामण बैसाणे याने पत्नी अनिता बैसाणे यांच्या गळ्यावर वार करून खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक एस. ऋषीकेश रेड्डी.

पश्‍चिम देवपूरचे पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाट, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत पारधी, धर्मेंद्र मोहिते, चंद्रशेखर नागरे, पुरुषोत्तम सोनवणे, दीपक गायकवाड, मनोहर पिंपळे, सुनील राठोड, नरेश मराठे, बंटी साळवे व पथकाने पाहणी केली. याप्रकरणी उशिरापर्यंत पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Anita Baisane, Hiraman Baisane
Crime News : रेल्वेत चोरी, छेडछाड प्रकरणी ४१ जणांवर कारवाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com