Dhule Zilla Parishad
sakal
धुळे: आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बहुप्रतीक्षित गट आरक्षणाची सोडत सोमवारी (ता. १३) जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आली. एकूण ५६ गटांपैकी निम्म्या म्हणजेच २८ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पुढील अडीच वर्षांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव झाले असल्याने या गटातील लढती विशेष लक्षवेधी ठरतील.