esakal | महाविकास आघाडीचा पोटनिवडणुकीत पॅटर्न...राऊत- भुजबळ यांच्या चर्चेनंतर 'हा' निर्णय 
sakal

बोलून बातमी शोधा

chhagan-bhujbal-and-sanjay raut.jpg

प्रभाग 22 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस, तर प्रभाग 26 मध्ये शिवसेनेला जागा सोडली जाणार आहे. कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ व शिवसेनेचे संपर्कनेते खासदार संजय राऊत यांच्याशी चर्चा झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या पॅटर्नचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही जागांवर कॉंग्रेस महाविकास आघाडीला मदत करणार आहे. 

महाविकास आघाडीचा पोटनिवडणुकीत पॅटर्न...राऊत- भुजबळ यांच्या चर्चेनंतर 'हा' निर्णय 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेच्या प्रभाग 22 व 26 मध्ये जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनुक्रमे 21 व 10 अर्ज दाखल झाले आहेत. पोटनिवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडीचा नवा पॅटर्न उदयाला येणार आहे. प्रभाग 22 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस, तर प्रभाग 26 मध्ये शिवसेनेला जागा सोडली जाणार आहे. कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ व शिवसेनेचे संपर्कनेते खासदार संजय राऊत यांच्याशी चर्चा झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या पॅटर्नचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही जागांवर कॉंग्रेस महाविकास आघाडीला मदत करणार आहे. 

नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने पोटनिवडणूक

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी प्रभाग २६ मधून, तर भाजपच्या सरोज अहिरे यांनी प्रभाग 22 मधून नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने पोटनिवडणूक होत आहे. अर्ज माघारीनंतर पोटनिवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे. बिनविरोध निवडणूक होण्याची शक्‍यता मावळल्यात जमा असून, त्याला कारण म्हणजे महाविकास आघाडीचा पॅटर्न यात राबविला जाणार आहे. 
 

हेही वाचा > धरणावर फिरायला आलेले पर्यटक गाडीपाशी गेले..अन् गाडीत पाहिल्यावर धक्काच...कारण.. 

पोटनिवडणुकीसाठी नाशिकमध्ये महाविकास आघाडी अस्तित्वात आली असून, दोन्ही प्रभागांत राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेला कॉंग्रेस मदत करेल. - शरद आहेर, शहराध्यक्ष, कॉंग्रेस 

हेही वाचा > शिक्षकाच्या खोलीतून वाफा बाहेर येत होत्या... त्यांनी खिडकीचा कप्पा उघडून पाहिला तर धक्काच!

हेही वाचा > पक्षातून फुटलेल्यांना पदे...अन् आम्हाला फक्त शिस्तीचे धडे काय?