"बीएलओ' कामाची सक्ती नको

Do not force teachers to BLO work
Do not force teachers to BLO work

साक्रीः  प्राथमिक शिक्षक त्यांच्या अनेक जबाबदाऱ्या सांभाळत "बीएलओ'चे कामही सांभाळतात. असे असताना "बीएलओ'चे काम करताना अनेक अडचणीही उद्‌भवत असून, या कामाची शिक्षकांना सक्ती करू नये, अशी मागणी साक्री तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने केली.

याबाबत तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण चव्हाणके यांना आज निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, की "बीएलओ'चे काम निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार फक्त सुटीच्या काळात करण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. तरीही हे काम दीर्घ कालावधीसाठी व ऑनलाइन करावयाचे असल्याने ते करताना शिक्षकांना शालेय कामात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यातच शिक्षकांकडे अन्य कामेही सोपविण्यात येत आहेत. सध्या शिक्षकांचे निष्ठा हे प्रशिक्षण सुरू आहे.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रअंतर्गत शाळा सिद्धी शालेय गुणवत्ता वाढ उपक्रमांतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षा याच महिन्यात असल्याने त्यांचे सराव वर्ग सुरू आहेत. शिक्षण विभाग व ग्रामविकास विभाग स्तरावरून अनेक उपक्रमही शिक्षकांमार्फत राबविले जात आहेत. द्वितीय सत्र परीक्षा जवळ आली आहे. अनेक शिक्षकांना हागणदारीमुक्त सर्वेक्षणाचे काम दिले आहे. हे सर्व करताना शिक्षक "बीएलओ'ची जबाबदारीही पार पाडत आहेत. ग्रामीण भागात ऑनलाइन काम करताना अनेक तांत्रिक अडचणी उद्‌भवतात. या सर्व गोष्टींत शिक्षकांना वेळ कमी मिळतो आणि विद्यार्थ्यांकडे शैक्षणिकदृष्ट्या दुर्लक्ष होते.

अशाही स्थितीत प्राथमिक शिक्षक स्वेच्छेने ऑनलाइन "बीएलओ'चे काम करत आहेत. यात त्यांना वेळेचे बंधन घालू नये, डेटासह अँड्रॉइड मोबाईल पुरवावेत, हे काम मुख्याध्यापकांना देऊ नये, मागील काळातील मानधन तातडीने बॅंक खात्यात जमा करावे, ग्रामपंचायत कार्यालयात इंटरनेटसह डाटा ऑपरेटर असल्याने त्यांच्याकडून ऑनलाइन कामे करून घ्यावीत, शिक्षकांना वारंवार वरिष्ठांकडून कारवाईच्या धमकीवजा सूचना दिल्या जाऊ नयेत, अशी मागणी करण्यात आली. समितीचे अध्यक्ष विनोद पाटील, सरचिटणीस सुभाष पगारे, मधुकर देवरे, रवींद्र पेंढारे, मनोहर सोनवणे, अनिल अहिरे, अरुण खैरनार, विजय खैरनार, विक्रम सोनवणे, संतोष शिंदे, वसंत वसावे आदी उपस्थित होते.
            

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com