Dhule News : मुंबई-आग्रा महामार्गावर आयशर कंटेनर खाक; ट्रकसह 30 लाखांचे नुकसान

Eicher container was burnt on  Mumbai Agra highway dhule news
Eicher container was burnt on Mumbai Agra highway dhule newsesakal

सोनगीर (जि. धुळे) : मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai Agra Highway) सोनगीरपासून सुमारे दीड किलोमीटरवर शिरपूरकडे जाणाऱ्या ट्रॅकवर आयशर कंटेनर (एमएच १८, बीए ०११६) जळून खाक झाला.

त्यामुळे ट्रकसह २८ ते ३० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. (Eicher container was burnt on Mumbai Agra highway dhule news)

सुदैवाने चालकाने तत्पूर्वीच उडी घेतल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना मंगळवारी (ता. २१) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. वायर बॉक्समधील शॉर्टसर्किटमुळे कंटेनरने पेट घेतला असावा, असे सांगण्यात आले.

दरम्यान, त्याच मार्गाने जाणाऱ्या अन्य वाहनांनी कंटेनरमधील सौंदर्यप्रसाधने व शालेय साहित्य उचलून पोबारा केला. तर एक चालकाचा असा प्रयत्न उपस्थितांनी हाणून पाडत चांगलाच चोप दिला. इंदूरचे अब्दुल घौरी यांचा मालकीचा कंटेनर होता.

भिवंडीहून सौंदर्यप्रसाधने, साबण, शालेय साहित्य, गणवेश, चपला आदी भरून चालक साजिद खान (रा. अलवर, राजस्थान) सोमवारी सायंकाळी इंदूरकडे जाण्यासाठी निघाला. सोनगीर ओलांडून वाघाडी फाट्याजवळ वाहनातून धुराचा वास आल्याने व तो बॉक्समधून निघत असल्याचे दिसून आले.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Eicher container was burnt on  Mumbai Agra highway dhule news
Dhule Crime News : निमडाळे शिवारात सव्वा कोटीचा गुटखा जप्त; हृषीकेश रेड्डींसह पथकाची धडक कारवाई

त्यामुळे चालकाने वाहन थांबवून उडी घेतली. थोड्याच वेळात कंटेनरच्या केबिनने पेट घेतला. आगीच्या लोळामुळे त्या ट्रॅकवरील वाहने थांबली. विरुद्ध ट्रॅकवरील हॉटेलचे मालक अर्जुन मराठे धावून गेले. श्रावण बागूल यांच्या टँकरने पाणी आणून आग आटोक्यात आणली. कंटेनरमधील आग विझविण्यात यश आले.

थोड्या वेळाने कंटेनरमधील वस्तू लांबविण्याची स्पर्धाच लागली. चालक एकटाच असल्याने हताशपणे पाहत होता. पुन्हा मराठे व बागूल व ढाब्यावरील कामगारांनी चोरट्यांना हाकलले. त्यामुळे इतरांनीही मदत केली. शिरपूरच्या एकास चौदावे रत्नही दाखविले. येथील पोलिस ठाण्यात अग्नी अपघाताची नोंद झाली असून, हवालदार कुदरत अली सईद तपास करीत आहेत.

Eicher container was burnt on  Mumbai Agra highway dhule news
Unseasonal Rain : मालपूर येथील शेतकऱ्याने कांदापीक काढण्यासाठी लढविली नामी शक्कल!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com