Nandurbar Crime : ‘एटीएम’ची 1 कोटीची रोकड घेऊन कर्मचारी फरारी

Employee stolen  1 crore cash of ATM Nandurbar Crime
Employee stolen 1 crore cash of ATM Nandurbar Crimeesakal

Nandurbar Crime : एटीएम मशिनमध्ये कॅश भरण्यासाठी दिलेली एक कोटी पाच लाख रुपयांची रोकड कर्मचाऱ्याने लंपास केल्याची घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. (Employee stolen 1 crore cash of ATM Nandurbar Crime)

रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. नंदुरबार शहरातील धुळे चौफुलीजवळ रायटर कॉर्पोरेशन कंपनीची व्हॅन एका फायनान्स कंपनीची कॅश कलेक्शन करण्यासाठी थांबली होती.

त्यानंतर स्टेट बँकेच्या एटीएम मशिनमध्ये कॅश भरण्यासाठी जाणार होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Employee stolen  1 crore cash of ATM Nandurbar Crime
Nandurbar Crime News : तक्रारदारच निघाला आरोपी! स्थानिक गुन्हे शाखेकडून घटनेचा उलगडा...

त्या वेळी व्हॅनमधील कर्मचाऱ्याने ‘मी कॅश टाकून येतो’ असे सांगून मोटारसायकलवर एक कोटी पाच लाखांची रोकड घेऊन गेला.

मात्र दीड-दोन तास होऊनही तो परत आला नाही किंवा त्याने रोकडही मशिनमध्ये भरली नाही. त्यामुळे ही रोकड चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. याबाबत पोलिसांना माहिती कळविल्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी केली. रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Employee stolen  1 crore cash of ATM Nandurbar Crime
Jalgaon Crime : गर्लफ्रेंड झालेल्या विद्यार्थिनीवर अत्याचार; खोट्या नावाने प्रेमाचे नाटक, संबध अन्‌ हाती बेड्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com