Nandurbar News : अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात पहचान; आश्रमशाळांत 1 हजार 94 विद्यार्थ्यांची तपासणी

Counselor Mahesh Kuwar while distributing sickle cell guidance booklet to students at Ashram School.
Counselor Mahesh Kuwar while distributing sickle cell guidance booklet to students at Ashram School. esakal

Nandurbar News : महात्मा जोतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय, अक्कलकुवामार्फत तालुक्यातील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थांची ११ ते १५ एप्रिलदरम्यान रक्तगट तपासणी करण्यात आली. ग्रामीण रुग्णालयामार्फत ‘पहचान’ कार्यक्रम झाला. (Examination of 1 thousand 94 students in ashram school nandurbar news)

आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करून त्यांना रक्तगटाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना सिकलसेल, रक्तगट, अक्कलकुवा तालुक्यातील होणाऱ्या रस्ते अपघातांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. पहिल्या कार्यक्रमात रक्तगट तपासणी शिबिर मांडवा आश्रमशाळेत झाले.

शिबिरात ३१२ विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली. दुसऱ्या दिवशी मोरंबा येथील आश्रमशाळेत रक्तगट तपासणी शिबिर झाले. शिबिरात ३७५ विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली. तिसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात अलिविहीर येथील आश्रमशाळेत रक्तगट तपासणी शिबिर झाले. यात ४०७ विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली. पहचान कार्यक्रमांतर्गत एक हजार ९४ विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी झाली.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Counselor Mahesh Kuwar while distributing sickle cell guidance booklet to students at Ashram School.
Dhule News : यात्रोत्सवात लाकडी तगतरावाची ‘क्रेझ’; वाघ बंधू व्यस्त

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रामीण रुग्णालय, अक्कलकुवा आयसीटीसी समुपदेशक महेश कुवर, प्रशिक्षणार्थींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवाजी पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष परमार, मीनाक्षी कोकणी, शुभांगी गावित, फुळवांती तडवी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी, हीना पाडवी, मंदा वळवी, परिचारिका सोनाली पाडवी, राजेश पाडवी, मुख्याध्यापक मिलिंद देसले, संतोष चौधरी, अधीक्षक साईनाथ ओनरवाड, एम. जे. गावित नितीन कलाल आदींचे सहकार्य लाभले.

Counselor Mahesh Kuwar while distributing sickle cell guidance booklet to students at Ashram School.
Shahada Market Committee Election : कोणत्याही परिस्थितीत निवडणूक होणारच : अभिजित पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com