
मल्चिंग पेपरच्या खाली सूक्ष्म वातावरणनिर्मिती होते. ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण अधिक असते.
कापडणे : धुळे तालुक्यात फळ बागायतीचे क्षेत्रात अधिक वाढत चालली आहे. फळ बागायतीला आधुनिकतेची जोडही दिली जात आहे. परीणामी उत्पादनातही वाढ होत आहे. सध्या मल्चिंग पेपर अंथरुन होल पाडण्याचे काम सुरु आहे. शेतकर्यांची मल्चिंग पेपरमुळे खर्चात मोठी बचत होत आहे.
आवश्य वाचा- पोलिसांना पाहून पळ काढला; कारची तपासणीत सापडला अवैध साठा
तिसगाव व ढंढाणे ता.धुळे शिवारात बरेचशी शेती बरेड म्हणून ओळखली जाते. शेतकर्यांचा या शिवारात फळ बागायत करण्याकडे कल वाढला आहे. फळबागायतीसाठी मल्चिंग पेपर अंथरण्याचे व छिद्र पाडण्याचे काम सुरु आहे. धुळे तालुक्यात मच्लिंग पेपरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
मल्चिंग पेपरचे फायदे
बाष्पीभवनामुळे उडून जाणारे पाणी पूर्णतः थांबते. पाण्याची बचत होते. बाष्पीभवन थांबविल्यामुळे जमिनीतील क्षार वरच्या भागावर येण्याचे प्रमाण थांबते. खतांच्या वापरात बचत होते. खतांचे पाण्यात वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते. जमिनीत हानिकारक सूक्ष्मजीवांच्या वाढीस अटकाव होतो. वार्षिक तणाच्या वाढीस प्रतिकार होतो. प्लॅस्टिकच्या प्रकाश परिवर्तनामुळे काही किडी-रोग दूर जातात. जमिनीचे तापमान वाढते. जमिनीचे निर्जंतुकीकरण होण्यास मदत होते. आच्छादन पेपरच्या खाली सूक्ष्म वातावरणनिर्मिती होते. ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण अधिक असते.लाभदायक सूक्ष्मजीवांची क्रिया अधिक होते. पेपरखालील जमिनीचे मौलिक गुणधर्म सुधारतात. उगवण 2-3 दिवस लवकर होते. सूत्रकृमींचे प्रमाण कमी होते. पावसाच्या थेंबामुळे होणारी जमिनीची धूप थांबते, अशी माहिती शेतकर्यांनी दिली.
संपादन- भूषण श्रीखंडे