जीवापाड मेहनेत घेवून ही भाव मिळात नाही; मग काय ?शेतकऱ्याने थेट नाल्यातच फ्लाॅवर फेकली 

जीवापाड मेहनेत घेवून ही भाव मिळात नाही; मग काय ?शेतकऱ्याने थेट नाल्यातच फ्लाॅवर फेकली 

कापडणे : गेल्या महिनाभरापासून मेथी व कोथिंबीरीला भाव नाही. आता या यादीत फ्लाॅवरही आली आहे. अवघी दोन ते तीन प्रती किलोने व्यापारी खरेदी करीत आहेत. काढणीचा खर्चही निघत नसल्याने काढलेली फ्लाॅवर बाजारात न नेता थेट नाल्यातच फेकत आहेत. माल पिकवूनही शेतकर्‍याची किती वाईट अवस्था आहे. याकडे शासन बघेल का, अशी अपेक्षा शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहे.

यावर्षी खरीपात सलग तीन महिने पाऊस झाला. शिवारातील सर्वच भाजीपाला सडला आहे. उत्पादन हाती नसल्याने भाव अव्वाच्या सव्वा वाढला. आता उत्पादन बेतानेच निघत आहे. मात्र सलग आठ दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणाने भाजीपाल्याचे भाव पडले आहेत.

कापडणे परीसरात शंभरावर शेतकरी फ्लाॅवरचे उत्पादन घेतात. फ्लाॅवरला शहादा, मालेगाव, शेंदावा, धुळे व सुरतच्या बाजारात मोठी मागणी आहे. तरीही भाव कोसळले आहेत. प्रती किलो दोन व तीनचा भाव मिळत आहे. तर गल्ली बोळातील विक्रेते दीड दोन किलोचा फ्लाॅवर गड्डा अवघ्या दहामध्ये देत आहेत. भाजीपाल्याचे भाव कोसळतच असल्याने शेतकर्‍यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान अधिकार माळी यांनी फ्लाॅवरवर रोटा फिरवीला. भाव पडल्याने सुरेश माळी, अधिकार माळी, सुदाम माळी, सुनील माळी, राजेंद्र माळी, दगा मोरे, संजय माळी आदी भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

दिल्लीत शेतकर्‍यांसाठी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या बाबतीत दोन मतप्रवाह आहेत. अधिकाधिक मतप्रवाह शेतकर्‍यांच्या बाजूनेच आहेत. दिल्लीत दोन राज्याचे शेतकरी एकवटलेत पण राज्यातील शेतकर्‍यांसाठी आंदोलन करणार्‍या संघटनांनी एकदिवशीय पाठिंबा देवून काय साध्य केले अनुत्तरीत प्रश्न आहे. भाजीपाला उत्पादक शेतकरी मात्र यावर्षी अती पावसाने व भावच नसल्याने ठार मेले आहेत. याकडे कुणी बघेल का ?
महेंद्र प्रकाश पाटील, युवा शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com