Dhule Crime News : सावकारी जाचाला कंटाळून तापीत उडी घेत आत्महत्या | Fed up with money lenders he committed suicide by jumping into tapi river Dhule News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Dhule Crime News : सावकारी जाचाला कंटाळून तापीत उडी घेत आत्महत्या

Dhule News : सावकारांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून २० वर्षीय तरुणाने तापी नदीत उडी टाकून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (ता.२७) दुपारी घडली.

दुर्गेश दीपक धनगर असे मृत तरुणाचे नाव असून तो शहरातील क्रांतीनगरमधील रहिवासी आहे.

दुपारी अडीचला दुर्गेशने त्याच्या मोबाईलमध्ये व्हॉटसअ‍ॅप या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अकाऊंटवर आत्महत्या करीत असल्याबाबत स्टेटस ठेवले होते. (Fed up with money lenders he committed suicide by jumping into tapi river Dhule News)

त्यात माझ्या आईवर आणि भावावर कर्ज झाले आहे, कर्ज देणारे खूप त्रास देत आहेत, त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे अशा आशयाचा मजकूर होता. तो पाहिल्यानंतर त्याच्या मित्रांमध्ये खळबळ उडाली. त्याचा शोध घेण्यासाठी मित्र रवाना झाले.

मात्र दुपारी तीनला सावळदे (ता. शिरपूर) येथील पुलावरून तापी नदीत उडी टाकताना त्याला काहींनी पाहिले. त्यानंतर लगेचच त्याचा शोध सुरु झाला. सायंकाळी उशिरा त्याचा मृतदेह हाती लागला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दुर्गेश धनगर याच्या वडिलांचे निधन झाले असून त्याच्या मागे आई, मोठा भाऊ व बहीण आहे. त्याच्या मोठ्या भावाने काही जणांकडून कर्ज घेतले होते. प्रचंड व्याजदर लावल्यामुळे कर्जाची रक्कम वाढत गेली.

संशयित सावकार भावाला मारहाण करून वसुली करू लागले. त्यामुळे भावाने काही दिवसांपूर्वी शिरपूर सोडले. नंतर सावकारांनी आपला मोर्चा दुर्गेशकडे वळवला. त्यालाही धमकावणे सुरु झाले. त्यांच्या त्रासाला वैतागून त्याने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.