VIDEO : मालेगावात अग्नितांडव...सहा घरे जळून खाक...चार महिन्याचा बालकाचा मृत्यू

प्रमोद सावंत : सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

आग इतकी भीषण होती की यात अस्सान मोबीन अहमद या चार महिन्याचा बालकाचा गंभीररित्या भाजल्याने  मृत्यू झाला आहे. तसेच या बालकाची आई यास्मीन अहमद जखमी झाली आहे. लागलेल्या आगीत दोन घरे जळून संपूर्णत: खाक झाली आहेत. तसेच घरे, संसारोपयोगी साहित्य जळाल्याने नागरिकांचे लाखोचे नुकसान झाले आहे.

नाशिक : मालेगाव शहरातील अय्युबनगर भागात आग लागल्याने एकच खळबळ उडाली. मंगळवारी दुपारी घडली दुर्घटना घडली असून या अग्नितांडवात तब्बल सहा घरांना आग लागली आहे. आग इतकी भीषण होती की यात अस्सान मोबीन अहमद या चार महिन्याचा बालकाचा गंभीररित्या भाजल्याने  मृत्यू झाला आहे. तसेच या बालकाची आई यास्मीन अहमद जखमी झाली आहे. लागलेल्या आगीत दोन घरे जळून संपूर्णत: खाक झाली आहेत. तसेच घरे, संसारोपयोगी साहित्य जळाल्याने नागरिकांचे लाखोचे नुकसान झाले आहे.

अग्निशमन दलाच्या जवानांची चांगलीच कसरत

आग लागल्याचे कळताच मनपा अग्निशमन दलाच्या सात बंबांनी विझविली. सहा मिटर अरूंद गल्लीतील आग विझवितांना अग्निशामक दलाच्या जवानांना चांगलीच कसरत करावी लागली. अग्निशमन दलाचे अधिक्षक संजय पवार व जवानांच्या तत्परतेमुळे २०१८ मध्ये झालेल्या नागछाप झोपडपट्टी आगीची पुनर्रावुत्ती टळली. आगेचे नेमके कारण जरी स्पष्ट झाले नसले तरी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा > PHOTO : दुभाजक ओलांडून एसटी घुसली थेट पंक्‍चर दुकानात..अन्...

हेही वाचा > पुन्हा सैराटचा थरार...बहिणीचे प्रेमसंबंध समजताच भावाने..

 

हेही वाचा > मोबाईलवर कार्टून दाखविण्याचे सांगत सात वर्षाच्या चिमुकलीला नेले वरच्या खोलीत..अन्.. 

हेही वाचा > महिलेचा आरडाओरड ऐकू आल्याने 'त्यांनी' तिथे जाऊन पाहिले...बघताच...

बघा > PHOTO : उपाशीपोटी वयात असलेली 'ती' परप्रांतीय तरुणी...भेदरलेल्या अवस्थेत टोल नाक्यावर उभी होती...त्यातच..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire at Malegaon four months baby died Nashik Marathi News