Dhule News : आदिवासी सुगरणींकडून पाककौशल्याचे दर्शन; खवय्यांसाठी खमंग आस्वादाची पर्वणी

Forest Vegetable Competition 2023 on 27 september dhule nandurbar news
Forest Vegetable Competition 2023 on 27 september dhule nandurbar news esakal

Dhule News : आदर्श बारीपाडा (ता. साक्री) येथे पर्यटन संचालनालय आणि बारीपाडा जैवविविधता संरक्षण समितीतर्फे रविवारी (ता. २७) अनोखी वनभाजी स्पर्धा-२०२३ होणार आहे.

या माध्यमातून आदिवासी सुगरणींकडून पाककौशल्याचे दर्शन तर होईलच, शिवाय संरक्षित आणि संवर्धित वनक्षेत्रातील दुर्मिळ वनभाज्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना चाखता येतील. या उपक्रमातून आदिवासी महिलांचे सबलीकरण साधण्याचा प्रयत्न होतो. ही स्पर्धा १९ वर्षांपासून सुरू आहे. (Forest Vegetable Competition 2023 on 27 september dhule nandurbar news)

वनभाजी स्पर्धेपूर्वी बारीपाडा येथे शनिवारी (ता. २६) सकाळी जनजाती योद्धा प्रदर्शनी, श्री धान्य (भरडधान्य) प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रम होतील. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, नाशिकस्थित उपमुख्याध्यापक शरद शेळके प्रमुख पाहुणे असतील.

वनभाज्यांचा आस्वाद

जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेत रविवारी (ता. २७) सकाळी अकराला वनभाजी स्पर्धा होईल. विशेष निमंत्रित पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेचे सीईओ शुभम गुप्ता, उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग, नाशिकस्थित पर्यटन उपसंचालक मधुमती सरदेसाई-राठोड, प्रमुख वक्ते व राष्ट्रीय जनजाती आयोगाचे हर्ष चव्हाण उपस्थित असतील. स्पर्धेत आदिवासी महिलांनी तयार केलेल्या खमंग भाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी राज्यभरातील खवय्यांची बारीपाड्यात गर्दी होते. बारीपाड्यासह परिसरातील मोगरपाडा, मापलगाव, शेंदवड, चावडीपाडा, मांजरी, मतकुपीपाडा येथील महिला उत्स्फूर्तपणे सहभागी होतात.

स्पर्धेचे वैशिष्ट्य

पाककला स्पर्धा ठिकाणी तज्ज्ञांकडून स्वयंपाकाची पद्धत, वैयक्तिक स्वच्छता, थाळीतील मांडणी, सजावट आदी तपशिलाच्या आधारे वनभाज्यांचे परीक्षण करण्यात येते. स्पर्धक महिलांशी संवाद साधून व स्वतः भाज्यांचा स्वाद घेऊन परीक्षण नोंदविले जाते. विजेत्या महिलांचा पारितोषिकांनी सन्मान केला जातो. धुळे-नंदुरबार जिल्ह्यामधील खवय्यांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Forest Vegetable Competition 2023 on 27 september dhule nandurbar news
Dhule Agriculture News : तेल्यामुक्त डाळिंबबागेसाठी प्रत्येक फळास पेपर रॅपिंग; शेतकऱ्यांची धडपड

दृष्टिक्षेपात स्पर्धा

• २७ ला सकाळी साडेआठला वनदर्शन

• सकाळी अकराला वनभाजी स्पर्धा प्रदर्शन

• दुपारी बारा ते दीड मान्यवरांचे मार्गदर्शन

• दुपारी दीडला भोजनात वनभाज्यांचा आस्वाद

• धुळे, नंदुरबारवासीयांना पर्यटनाची अनोखी संधी

स्पर्धेत ११० प्रकारच्या वनभाज्या

बारीपाड्यातील संरक्षित व संवर्धित वनक्षेत्रात आवळा, ओवाळी, कडुकंद, कुरडू, केळभाजी, केळी, कोहळा चित्रक, चंदळा, देवारी गोळची, दोडक, गोगल, गोमट, जंगलीचूच, मिरची भाजी, मेखा, पपई, राजगिरा, रानतुळस, कडव्याहलुंद, कडव्या, बाफळी, आळिंब, आळुपान, तेरा, चंदळा, कारले, कटुरले, सफेद मुसळी, नाळगूद, चवळ वेल, सुळ्या निंबू, सोनारू आदी ११० प्रकारच्या भाज्या आढळतात. त्या आरोग्यासाठी गुणकारी ठरतात. त्याची माहिती स्पर्धेवेळी मिळू शकेल.

"वनभाजी स्पर्धेला यंदा पर्यटन विभागाची बहुमोल साथ लाभते आहे. आदिवासी महिला स्पर्धेपूर्वी वनक्षेत्रातून ताज्या वनभाज्या शोधून आणत शिजवितात. काही वाफेवर शिजतात. पाण्यात भिजवून मूळ स्वादासह काही भाज्या स्पर्धेत सादर केल्या जातात. निसर्गतः वाढणाऱ्या वनभाज्यांची जगाला ओळख व्हावी तसेच जैवविविधता संवर्धनाला चालना मिळण्याच्या हेतूने वनभाजी पाककला स्पर्धा होते. आदिवासी महिलांच्या पाककौशल्याचे दर्शन होते." -चैत्राम पवार, अध्यक्ष, जैवविविधता समिती, बारीपाडा

Forest Vegetable Competition 2023 on 27 september dhule nandurbar news
Dhule News : फुलाबाईंनी फुलविले हजारो बालजीव..! 90 वर्षांत हजारावर सुखरूप बाळंतपणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com