Gaur Gopal Das
sakal
धुळे: आज आहे ते उद्या असेलच, याची शाश्वती नसते. त्यामुळे कशाचाही गर्व नको आणि तणाव तर मुळीच नको, असा साधा; पण सार्थ मौलिक सल्ला ‘इस्कॉन’चे प्रेरणादायी वक्ते गौर गोपाल दास प्रभूजी यांनी दिला. जीवनातील स्पर्धा, तुलना आणि सततचा दबाव यात माणूस स्वतःचा आनंद हरवून बसतो. त्यामुळे स्वतःसाठी जगण्याची कला जपावी, असे त्यांनी आवर्जून सांगितले.