सत्ता स्थापन केली..विश्‍वासमतंही मिळणार : गिरीश महाजन  

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 November 2019

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने पुन्हा सत्ता स्थापन केली आहे. जनतेच्या हितासाठीच आम्ही सत्ता स्थापन केली आहे. ज्या विश्‍वासाने आम्ही ही सत्ता स्थापन केली, त्याच विश्‍वासाने आम्ही विश्‍वासमतही जिंकून दाखवू. येत्या पाच वर्षांत आम्ही राज्यातील जनतेला स्थिर व मजबूत सरकार देणार आहोत. असे गिरीश महाजन म्हणाले

जळगाव : राज्यात भारतीय जनता पक्षाने पुन्हा सत्ता स्थापन केली आहे. विश्‍वासमतही आम्ही खात्रीपूर्वक जिंकणार आहोत, असा विश्‍वास भाजपचे नेते व संकटमोचक गिरीश महाजन यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला. 
भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबतच्या काही आमदारांच्या सहकार्याने राज्यात सत्ता स्थापन केली. शनिवारी (ता. 23) सकाळी आठला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या वेळी त्यांच्यासमवेत राज्यपाल भवनात भाजपचे नेते गिरीश महाजनही उपस्थित होते.

भाजप पूर्ण विश्‍वासाने जिंकणारच 

 याबाबत महाजन यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने पुन्हा सत्ता स्थापन केली आहे. जनतेच्या हितासाठीच आम्ही सत्ता स्थापन केली आहे. ज्या विश्‍वासाने आम्ही ही सत्ता स्थापन केली, त्याच विश्‍वासाने आम्ही विश्‍वासमतही जिंकून दाखवू. येत्या पाच वर्षांत आम्ही राज्यातील जनतेला स्थिर व मजबूत सरकार देणार आहोत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girish Mahajan Statement on Supremacy political news