Nandurbar News : काळ आला होता; पण...! समयसूचकतेने योगिनीने वाचविले तिघांचे प्राण

Yogini Pardeshi with father Sunil Pardeshi.
Yogini Pardeshi with father Sunil Pardeshi. esakal

Nandurbar News : शहरातील नेमसुशील प्राथमिक विद्यामंदिरात सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या योगिनी परदेशी हिच्या सतर्कतेमुळे व समयसूचकतेमुळे नेमसुशील विद्यामंदिरातीलच मुख्याध्यापक तथा तिचे वडील सुनील परदेशी यांच्यासह आई व आजीचा जीव वाचला.

योगिनीच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून, शहरात तिच्या तत्परतेबद्दल चर्चा होत आहे. (girl saved lives of 3 from electric shock nandurbar news)

नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यावर सुनील परदेशी घरी आले. यादरम्यान वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, घरात इन्व्हर्टर असूनही वीज गेल्याने त्यांनी इन्व्हर्टरचा स्वीच तपासून पाहिला. त्यादरम्यान अचानकपणे त्यांचा स्पर्श वीजप्रवाह करणाऱ्या वायरला झाला अन् त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला.

सुदैवाने घरात परदेशी यांची मुलगी योगिनी, तसेच आई व पत्नी होत्या. परंतु, वीजप्रवाहातून त्यांना सोडवावे कसे, असा प्रश्न त्यांना पडला. त्यांना सोडविण्यासाठी आई व पत्नी यांनी अतोनात प्रयत्न केले.

परंतु, त्या हतबल झाल्या. शेवटी त्यांना सोडविण्याच्या प्रयत्नात आई व पत्नीही त्यांच्या संपर्कात आल्या आणि त्यांना स्पर्श करताच एकमेकांना विजेचा जबर धक्का बसला. शेवटी योगिनी सर्वांचा जीव वाचविण्यासाठी धावून आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Yogini Pardeshi with father Sunil Pardeshi.
Nandurbar News : कन्यारत्नप्राप्त माता, पालकांचा करणार सन्मान; सोनबुद्रुक ग्रामपंचायतीचा निर्णय

योगिनीने लाकडी स्टूल आणून वीजप्रवाह करणाऱ्या वायरच्या दिशेने सरकावत वायर बाजूला केली. त्यामुळे सर्वांचा जीव वाचला. अवघ्या सातवीत असलेल्या योगिनीने आपल्या पित्याचे प्राण जणू अभ्यासू वृत्तीने वाचविले, असेच म्हणावे लागेल. काळ आला होता; पण वेळ योगिनीने रोखून धरली होती.

आपल्या ज्ञानाच्या जोरावर व प्रयत्नांनी आजी, आई व वडिलांचा जीव तिने वाचविला. ही घटना जेव्हा परिसरातील नागरिकांना व विद्यामंदिरातील शिक्षकांना कळली, तेव्हा लगेचच सर्वांनी श्री. परदेशी यांच्या घराकडे धाव घेतली व परिस्थिती जाणून घेतली. परिसरातील नागरिक व नेमसुशील विद्यामंदिरातील शिक्षकांनी योगिनीच्या प्रसंगावधानाचे कौतुक करीत तिचे अभिनंदन केले व तिच्या धाडसी वृत्तीला सर्वांनी सलाम केला. आज संपूर्ण शहरात तिच्या तत्परतेबद्दल चर्चा होत आहे.

Yogini Pardeshi with father Sunil Pardeshi.
Nandurbar News : नवसाक्षरता अभियान सर्वेक्षण कामाबाबत शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष; कामावर बहिष्कार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com