जिच्यासाठी जीवाची बाजी लावली...चक्क तिनेच दिला 'हा' धोका..अन् धक्काही

सतीश निकुंभ : सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 25 December 2019

मुलगा उत्तर प्रदेशचा व मुलगी नाशिकमधील सातपूर येथे राहणारी. या दोघांचीही ओळख एका नातेवाईकाच्या लग्नात झाली. ओळखीचे हळूहळू प्रेमात रूपांतर झाले. दोघांनीही मागील महिन्यातच वयाची 18 वर्षे पूर्ण केली. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण दोघांच्याही घरांतून विरोध झाल्याने शेवटी पळून जाऊन लग्न करण्याचा प्लॅन तयार केला. त्यासाठी या बहाद्दराने थेट यूपीवरून नाशिक गाठले. पण पुढे..

नाशिक :  पळून जाऊन लग्न करण्यासाठी मुलाने थेट उत्तर प्रदेशवरून सातपूर गाठले खरे; पण ही बाब मुलीच्या नातेवाइकांना समजल्याने मुलाचा पळून जाऊन लग्न करण्याचा प्लॅनच फसला. स्वप्न रंगायच्या आधीच सातपूर पोलिस ठाणे गाठावे लागले. ऐन वेळी मुलीनेही लग्नाला नकार दिल्याने "जिस के लिए जिंदगी दाव पर लगाई, उसने ही धोका दिया', असे म्हणण्याची वेळ प्रेमी युवकावर आली. 

असे झाले सर्व...प्रेमात धोका..

मुलगा उत्तर प्रदेशचा व मुलगी नाशिकमधील सातपूर येथे राहणारी. या दोघांचीही ओळख एका नातेवाईकाच्या लग्नात झाली. ओळखीचे हळूहळू प्रेमात रूपांतर झाले. दोघांनीही मागील महिन्यातच वयाची 18 वर्षे पूर्ण केली. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण दोघांच्याही घरांतून विरोध झाल्याने शेवटी पळून जाऊन लग्न करण्याचा प्लॅन तयार केला. त्यासाठी या बहाद्दराने थेट यूपीवरून नाशिक गाठले. पण याचा सुगावा मुलीच्या नातेवाइकांना लागला. मुलगी ठरल्याप्रमाणे घराबाहेर येत नसल्याने त्याने मुलीच्या घराकडे चकरा मारणे सुरू केले.

हेही वाचा > मुलीची देहविक्री...भरपूर पैसा..असे स्वप्न आईवडिलांचे..पण...

"यह यूपी या बिहार की पुलिस नहीं है, यह महाराष्ट्र की पुलिस है'

मुलीच्या आईने त्याला गोड बोलून घरी बोलवले व समजाविण्याचा प्रयत्न केला. पण मुलगा समजण्याच्या पलीकडे गेला. "मेरा पुलिस कुछ नही कर सकती', असे म्हणत धमकीही देऊ लागला. त्यामुळे मुलीच्या आईने त्या दोघांना घेऊन थेट पोलिस ठाणे गाठले. हा प्रकार पोलिसांना सांगितला. यावेळी संतापलेल्या मुलीच्या आईने मुलाला, "यह यूपी या बिहार की पुलिस नहीं है, यह महाराष्ट्र की पुलिस है', असे म्हणत मुलाकडून मुलीची सुटका व्हावी यासाठी विनवण्या केल्या. पहिल्यांदाच पोलिस ठाणे पाहिलेल्या मुलीने ऐन वेळी मुलाबरोबर लग्न करण्यास नकार दिल्याने नंतर मात्र मुलाच्या अडचणी वाढल्या. या प्रकरणात आपण पोलिसांच्या जाळ्यात अडकणार असे लक्षात येताच, उलट मुलीचे व आईच्या पाया पडून "याच्यातून माझी सुटका करा', अशी विनवणी करण्याची वेळ या प्रेमीवर आली.  

हेही वाचा > धरणावर फिरायला आलेले पर्यटक गाडीपाशी गेले..अन् गाडीत पाहिल्यावर धक्काच...कारण..

हेही वाचा > शिक्षकाच्या खोलीतून वाफा बाहेर येत होत्या... त्यांनी खिडकीचा कप्पा उघडून पाहिला तर धक्काच!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girlfriend refuses to marry A boy from Uttar Pradesh at the time of marriage Nashik Marathi News