मुलीची देहविक्री...भरपूर पैसा..असे स्वप्न आईवडिलांचे..पण...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 डिसेंबर 2019

पीडित अल्पवयीन मुलगी यापूर्वी अन्य जिल्ह्यात शिक्षण घेत होती. इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले असताना, ती व्यवसायाने चालक असलेल्या पित्याकडे नाशिकला आली. येथे तिच्या सावत्र आई व पित्याने तिचे शिक्षण सोडवत देहविक्री करण्यास सांगितले.

नाशिक : अल्पवयीन मुलीला देहविक्रय करण्यासाठी प्रवृत्त करून पैसे कमावणाऱ्या दांपत्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अंबड पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा, पॉक्‍सोंतर्गत गुन्हा दाखल झाला. वावरेनगर परिसरात केलेल्या या कारवाईत सोळावर्षीय पीडितेची सुटका केली असून, तिच्या पित्यासह सावत्र आईला अटक केली. 

असा घडला प्रकार...

वावरेनगर परिसरात आई-वडील मुलीला देहविक्रय करण्यास भाग पाडत असल्याची तक्रार पोलिस आयुक्‍तालयाला प्राप्त झाली होती. त्यानुसार अवैध धंदे कारवाई पथकाने सापळा रचला. सोमवारी (ता. 23) या पथकाने दांपत्याकडे तोतया ग्राहक पाठवत तक्रारीची उलटतपासणी केली. यातून संबंधित जोडपे अल्पवयीन मुलीला देहविक्रयासाठी बळजबरी करत असल्याचे आढळल्याने पथकाने पीडितेच्या आई-वडिलांना ताब्यात घेतले. दोघांकडून 16 मोबाईल, सीडी, दुचाकी, 13 हजार 950 रुपये रोख, इतर साहित्य असा 92 हजार 70 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 
 

हेही वाचा > धरणावर फिरायला आलेले पर्यटक गाडीपाशी गेले..अन् गाडीत पाहिल्यावर धक्काच...कारण..

शिक्षण सोडवून केले प्रवृत्त 
पीडित अल्पवयीन मुलगी यापूर्वी अन्य जिल्ह्यात शिक्षण घेत होती. इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले असताना, ती व्यवसायाने चालक असलेल्या पित्याकडे नाशिकला आली. येथे तिच्या सावत्र आई व पित्याने तिचे शिक्षण सोडवत देहविक्रय करण्यास प्रवृत्त केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.  

हेही वाचा > शिक्षकाच्या खोलीतून वाफा बाहेर येत होत्या... त्यांनी खिडकीचा कप्पा उघडून पाहिला तर धक्काच!

हेही वाचा > पक्षातून फुटलेल्यांना पदे...अन् आम्हाला फक्त शिस्तीचे धडे काय?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Motivating a girl to have sex by Step mother arrested with father Crime Nashik Marathi News