पर्यटक म्हणून गेले अन् जलमित्र बनले...

पर्यटक म्हणून गेले अन् जलमित्र बनले...

इगतपुरी : पर्यटनाची आवड सर्वांनाच असली तरी पर्यटन स्थळांबद्दलची आत्मियता प्रत्येकजण जपतोच असे नाही.किंबहूना तेथे अस्वच्छता करणे पर्यटन स्थळांचे आणि  विद्रूपीकरण करण्याचा उद्योग करणारेच अधिक असतात.मात्र नाशिकमधील काही तरुणांनी केवळ पर्यटनस्थळावरील निसर्गाविष्काराचा आनंद घेतला नाही, तर परिसरात जलसंधारणाचे काम हाती घेऊन सामाजिक बांधिलकीचा परिचयही करुन दिला आहे.त्यामुळे शहापूर तालुक्यातील उमरावणे गावाची वाटचाल भाविष्यासाठी जलयुक्त आणि टंचाई मुक्तीच्या दिशेने करून दिली आहे. 

नाशिक, अहमदनगर आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमारेषेवर शहापूर तालुक्यात उमरावणे हे छोटेसे गाव आहे. या गावालगतच्या परिसराला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे.विहीगाव येथील अशोका धबधबा पहाण्यासाठी राज्यभरातील पर्यटक या भागात येत असतात.निसर्गाचा हा नितांत सुंदर अविष्कार नेत्रांमध्ये साठविण्यासाठी पावसाळ्यात पर्यटकांची येथे नेहमीच झुंबड उडत असते.

नाशिकमधील गुरूगोविंद सिंग इंजिनीअरिंग कॉलेजचे काही विद्यार्थी गत पावसाळ्यात येथे धबधबा पाहण्यासाठी गेले होते.अन्य ठिकाणांहून आलेल्या पर्यटकांशी गप्पा मारताना त्यांना उमराणे गावातील टंचाईबाबतची माहिती मिळाली ही बाब लक्षात ठेऊन या विद्यार्थ्यांनी पुन्हा या गावाला भेट दिली.गावातील दोन सार्वजनिक विहिरी आणि हापसा आटल्यामुळे चिल्यापिल्यांसह महिलांना पाण्यासाठी चार-पाच किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याचे विदारक चित्र त्यांना पहावयास मिळाले. 

जलसमृध्दी अभियान या नावाखाली त्यांनी या गावामध्ये श्रमदानातून जलसंधारणाची कामे करण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार या मुलांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली प्रत्येक शनिवार व रविवारी 25 ते 30 विद्यार्थ्यांचा ग्रुप भल्यासकाळी येथे श्रमदानासाठी दाखल होत होता सायंकाळी उशिरापर्यंत येथे श्रमदान केले येथे या तरुणाईने तीन दगडी नालाबांद तयार केले असून विहिरीतील गाळही काढला आहे.तसेच पाच शोषखड्डे तयार करण्यात आले असून,येत्या काही दिवसात 50 सीसीटीचे कामही हाती घेण्यात येणार आहेत गुरू गोविंदसिंग इंजिनीअरिंग कॉलेजच्या सिव्हील आणि मॅकेनिकल विभागाच्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी या श्रमदानात स्वत:ला झोकून दिले असून, त्याचे फळ ग्रामस्थांना या पावसाळ्यानंतर नक्कीच चाखायला मिळू शकणार आहे.

गावासाठी जमा होणार 65 लाख लिटर पाणी : या गावाची पाण्याची गरज वर्षाकाठी 54 लाख लिटर एवढी आहे  त्यांची सध्या 10 लाख लिटर पाण्याची व्यवस्था होते.परंतु,जलसमृध्दी अभियानांतर्गत केल्या जात असलेल्या कामांमुळे येथे 65 लाख लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण होणार आहे. याचाच अर्थ गरजेपेक्षाही 20 लाख लिटर अधिक पाणीसाठा त्यांना उपलब्ध करून देण्याचा या विद्यार्थ्यांचा प्रयत्न आहे.या भागात सध्या पाऊस सुरु झाला असला तरी काम पूर्ण होईपर्यंत हे श्रमदान सुरूच ठेवण्यात येणार आहे.या गावाला टंचाईमुक्त करण्याचा निर्धार या जलमित्रांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com