Dhule Fraud Crime : शासनाची 75 लाखांत फसवणूक; रुणमळीच्या निलंबित ग्रामसेवकासह तिघांवर गुन्हा

रुणमळी (ता. साक्री) ग्रामपंचायतीच्या निलंबित ग्रामसेवकासह तिघांनी शासनाची तब्बल ७५ लाखांत फसवणूक केली आहे.
Government defrauded of 75 lakhs Dhule News
Government defrauded of 75 lakhs Dhule News esakal

Dhule News : रुणमळी (ता. साक्री) ग्रामपंचायतीच्या निलंबित ग्रामसेवकासह तिघांनी शासनाची तब्बल ७५ लाखांत फसवणूक केली आहे. तिघांनी विविध योजनांतील रकमा, निधी बँकेतून परस्पर काढून अपहार केला.

या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. (Government defrauded of 75 lakhs Dhule News)

याबाबत साक्रीचे विस्ताराधिकारी जगदीश खाडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की रुणमळी ग्रामपंचायतीचे निलंबित ग्रामसेवक सी. पी. गायकवाड, सरपंच सीताबाई दामू माळचे व उपसरपंच सीमाबाई अनिल पवार यांनी आर्थिक फायद्यासाठी १५ व्या वित्त आयोग योजना, पेसा ग्रामकोश समिती निधी, ग्रामनिधी व स्वच्छ भारत मिशनच्या निधीच्या रकमा वेळोवेळी बँकेतून काढून शासनाचा विश्‍वासघात केला.

Government defrauded of 75 lakhs Dhule News
Dhule Fraud Doctor: बोगस बंगाली डॉक्टरांविरुद्ध मोहीम राबविण्याची गरज; स्थानिक आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

फसवणूक करून ७५ लाख ८८ हजार ७८२ रुपयांची आर्थिक अनियमितता केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ग्रामसेकास साक्रीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी निलंबित केले. हा प्रकार २०१८ ते २०२३ यादरम्यान घडला. या प्रकरणी संशयित तिघांवर गुन्हा दाखल झाला.

Government defrauded of 75 lakhs Dhule News
Cyber fraud: मुल होत नसलेल्या महिलेला गर्भवती करा अन् बक्षीस मिळवा; बेरोजगार तरुणांच्या पडल्या उड्या!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com