शपथविधीला कॉंग्रेसच्या 'या' आमदारावर का चिडले राज्यपाल? 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 December 2019

“येथे मी निसर्गासमोर नतमस्तक होतो, माझ्या मतदारांचे मी आभार मानतो. ज्यांनी मला निवडून दिलं त्यांच्यापुढे मी नतमस्तक होतो. मी माझ्या मतदारांचा ऋणी आहे ” ही काही वाक्यं पाडवी यांनी लिहून आणली होती. ती शपथ पूर्ण झाल्यावर त्यांनी वाचून दाखवली. ज्यावर राज्यपाल कोश्यारी चांगलेच चिडले.

नाशिक : मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विविध आमदारांनी शपथ घेतली. मात्र यावेळी नंदुरबार अक्कलकुवाचे काँग्रेस आमदार के.सी. पाडवी यांनी शपथ घेतली तेव्हा त्यांनी शपथविधीचा मजकूर सोडून त्यांनी लिहून आणलेला मजकूरही वाचून दाखवला. ज्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पाडवी यांच्यावर चांगलेच चिडले आणि त्यांना शपथ पुन्हा घ्यायला लावली. स्वतःच्या मनातला मजकूर वाचायचा नाही, शपथ कशी घ्यायची असते? हे एकदा समोर शरद पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे बसले आहेत त्यांना विचारा असंही त्यांनी सुनावलं.

तर असे घडले सारे....
“येथे मी निसर्गासमोर नतमस्तक होतो, माझ्या मतदारांचे मी आभार मानतो. ज्यांनी मला निवडून दिलं त्यांच्यापुढे मी नतमस्तक होतो. मी माझ्या मतदारांचा ऋणी आहे ” ही काही वाक्यं पाडवी यांनी लिहून आणली होती. ती शपथ पूर्ण झाल्यावर त्यांनी वाचून दाखवली. ज्यावर राज्यपाल कोश्यारी चांगलेच चिडले. शपथ घ्यायची ही पद्धत नसते. जेवढं लिहून दिलं आहे तेवढंच वाचा. तुम्हाला शपथ कशी घ्यायची ते ठाऊक नसेल तर समोर शरद पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे बसले आहेत त्यांना विचारा असंही राज्यपालांनी पाडवी यांना सुनावले.

हेही वाचा > PHOTOS : दादा भुसेंना कॅबिनेट मंत्रीपदी बढती...मालेगाव तालुक्याची मंत्रीपदाची परंपरा कायम!

हेही वाचा > गुलाबराव पाटील; पानटपरी चालक ते कॅबिनेट मंत्री 

हेही वाचा >"मी किती खवय्या आहे, याची कल्पना माझ्याकडे पाहूनच येते" : फडणवीस 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Governor angry on Congress MLA K.C.Padvi due oath ceremony