esakal | गावगाड्याच्या महाआखाड्यासाठी प्रशासन सज्‍ज 
sakal

बोलून बातमी शोधा

गावगाड्याच्या महाआखाड्यासाठी प्रशासन सज्‍ज 

सकाळी साडेसातला मतदानास सुरवात होणार असून, निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये सायंकाळी साडेपाचला बंद होईल. 

गावगाड्याच्या महाआखाड्यासाठी प्रशासन सज्‍ज 

sakal_logo
By
विजयसिंह गिरासे

धुळे ः धुळे जिल्ह्यात २१८ ग्रामपंचायतींपैकी ३५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. शुक्रवारी (ता. १५) १८३ ग्रामपंचायतींच्या मतदानासाठी प्रशासन सज्‍ज झाले आहे. मतदान केंद्रावर कर्मचारी रवाना झाले. केंद्रनिहाय पोलिस बंदोबस्‍तही तैनात केला आहे. सकाळी साडेसातला मतदानास सुरवात होणार असून, निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये सायंकाळी साडेपाचला बंद होईल. 

वाचा- जमीन संपादनात ' हेराफेरी '! 185 शेतकरयांना दिल्या तहसीलदारांनी नोटीसा 
 

शिंदखेडा तालुक्यात ४८ ग्रामपंचायतींसाठी मतदान 
शिंदखेडा तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींसाठी १९९ प्रभाग असून, ५१३ जागांसाठी ९११ उमेदवार रिंगणात होते. त्यांपैकी १७६ उमेदवार बिनविरोध झाले आहेत. उर्वरित ३३५ जागांसाठी ७३५ उमेदवार निवडणुकीत भविष्य आजमावीत आहेत. यासाठी ३८ हजार १५५ महिला, तर ३९ हजार ३३० पुरुष असे एकूण ७७ हजार ३७५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान केंद्रावर ईव्हीएम मशिन व कर्मचाऱ्यांना पोचविण्यासाठी ९४ वाहनांची व्यवस्था केली होती. तीन वाहने राखीव ठेवली आहेत. निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी, तीन पोलिस उपनिरीक्षक, शिंदखेडा पोलिस ठाण्याचे २२ पोलिस कर्मचारी, धुळे शहराचे ७३ कर्मचारी व धुळे पोलिस मुख्यालयाचे पाच कर्मचारी असे एकूण १०० पोलिस कर्मचारी बंदोबस्ताला आहेत. तसेच ४५ होमगार्ड व पाच महिला होमगार्ड, आरसीपीचे एक पथक व एसआरपीचे एक सेक्शनची नियुक्ती केली आहे.


सोनगीर मतदान यंत्रणा सज्ज 
सोनगीर ः धुळे तालुक्यात सहा ग्रामपंचायती व १३० उमेदवार बिनविरोध झाल्यानंतर ६६ ग्रामपंचायतींच्या २३६ प्रभागांतील ५६४ जागांसाठी निवडणूक होत आहे. मतदान यंत्रणा पारदर्शक व तंटा न होता निवडणूक पार पाडण्यासाठी सज्ज झाली असून, पोलिसांचे सहकार्य घेतले जात आहे. धुळे तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतींमध्ये एकूण एक लाख ५९ हजार ४१ मतदार आहेत. त्यात ८१ हजार ८६८ पुरुष, तर ७७ हजार १७२ महिला मतदार आहेत. धुळे तालुक्‍यात एक हजार ३६७ उमेदवार रिंगणात असून, २४४ केंद्रांवर मतदान होत आहे. त्यासाठी दोन हजार २०० निवडणूक कर्मचाऱ्यांसह पोलिस तैनात असतील. 


आवर्जून वाचा- धिंडरा खाईल्या नी..मतदान करी या !
 

साक्री तालुक्‍यात १४४ केंद्रांवर यंत्रणा सज्‍ज 
साक्री : तालुक्यात तालुक्यात ४९ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया होत आहे. यात नऊ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित ४० ग्रामपंचायत उद्या मतदान होत आहे. यातही अनेक जागा बिनविरोध झाल्या असल्याने, सद्यःस्थितीत १४४ मतदान केंद्रे असून, यासाठी गुरुवारी कर्मचाऱ्यांच्या १४४ टीम यंत्रासह मतदान केंद्रांवर रवाना झाल्या आहेत. या टीममध्ये चार कर्मचाऱ्यांसोबत एक शिपाई व एक पोलिस कर्मचारीदेखील आहे. निवडणूक पार पाडण्यासाठी तहसीलदार प्रवीण चव्हाणके, नायब तहसीलदार डॉ. अंगद आसटकर, गोपाळ पाटील, संदीप सोनवणे, विनोद ठाकूर, जयवंत पाटील आदींसह कर्मचारी कार्यरत असून, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे, पोलिस निरीक्षक दिनेश आहेर कर्मचाऱ्यांसह बंदोबस्त ठेवून आहेत.  

 
 

loading image