esakal | धुळ्यामधील ग्रामपंचायत निवडणूकीत तीन पक्षांचे विजयाबाबत परस्परविरोधी दावे 
sakal

बोलून बातमी शोधा

धुळ्यामधील ग्रामपंचायत निवडणूकीत तीन पक्षांचे विजयाबाबत परस्परविरोधी दावे 

धुळे तालुक्यातील स्थानिक नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या सोमवारी जाहीर झालेल्या निकालानंतर विजयाबाबत परस्परविरोधी दावे केले.

धुळ्यामधील ग्रामपंचायत निवडणूकीत तीन पक्षांचे विजयाबाबत परस्परविरोधी दावे 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे  ः राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीमधील प्रमुख तीन घटक पक्षांच्या येथील धुळे तालुक्यातील स्थानिक नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या सोमवारी जाहीर झालेल्या निकालानंतर विजयाबाबत परस्परविरोधी दावे केले. यात त्यांनी आपापल्या ताब्यातील ग्रामपंचायतीच्या विजयी सदस्यांसमवेत विजयोत्सव साजरा केला. यात विरोधी भाजपनेही अनेक ग्रामपंचायती ताब्यात आल्याचा दावा केला. 

आवश्य वाचा- पैशांसाठी तरुणाचे अपहरण; मग काय, व्हाॅटसअप लोकेशनद्वारे पोलिसांचा सिनेस्टाईल शोध सुरू
 

धुळे तालुक्यासाठी येथील जेल रोडवरील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पार पडली. बिनविरोध ग्रामपंचायतीनंतर प्रत्यक्ष मतदान झालेल्या ६६ ग्रामपंचायतींसाठी ७७.१७ टक्के मतदान झाले होते. यंदा निवडणूक चुरशीची झाली. त्यामुळे निकालाबाबतही उत्सुकता होती. 

आमदार पाटलांचे वर्चस्व 
धुळे तालुक्यात आमदार कुणाल पाटील यांनी वर्चस्व राखत एकूण ७२ पैकी ६१ ग्रामपंचायतींवर काँग्रेसची एकहाती सत्ता राखल्याचा दावा समर्थक जवाहर गटाने पत्रकाव्दारे केला. यात शिरुड, नेर, कापडणे, सोनगीर, विंचूर येथे काँग्रेसचा झेंडा फडकला. तेथे विरोधक भाजपला नामोहरम करीत आमदार पाटील यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या पॅनलने एकहाती सत्ता मिळविली. त्यामुळे तालुक्यातून भाजपचा पूर्णपणे सफाया झाल्याचे जवाहर गटाने म्हटले आहे. निकालानंतर कार्यकर्त्यांनी आमदार पाटील यांच्या शहर कार्यालयासमोर आमदार पाटील यांच्या समवेत आतषबाजीसह ढोलताशांच्या गजरात विजयोत्सव साजरा केला.

वाचा- अबब! जळगाव शहातून पहिल्या दिवशी ३०८ टन कचरा केला संकलित 
 

निकालात भाजपचे जिल्हा परिषद सभापती बापू खलाणे, पंचायत समिती सभापती प्रा. विजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे, शंकर खलाणे, भाजपचे ज्येष्ठ नेते गजानन पाटील यांना काँग्रेसने झटका देत धूळ चारल्याचेही पत्रकात नमूद आहे. तत्पूर्वी, आमदार पाटील यांच्या नेतृत्वात आमदड, दापुरा, बोरविहीर, सांजोरी, चिंचवार, रामी या सहा ग्रामपंचायतीच्या निवडणूक बिनविरोध झाल्या. नंतर नांद्रे, निकुंभे, तरवाडे, भिरडाई- भिरडाणे, आंबोडे, बोरसुले, चिंचखेडे, पिंपरखेड, दह्याणे, मोरदडतांडा, दोंदवाड, गरताड, बांबुर्ले, गोंदूर, मोहाडी प्र. डा., खंडलाय खुर्द, अंचाळे, सरवड, मोराणे प्र.नेर, खंडलाय बुद्रूक, धामणगाव, कुंडाणे- वेल्हाणे, जुनवणे, देऊर खुर्द, बाबरे, बेंद्रेपाडा, नरव्हाळ, वडजाई, मोघण, मोरशेवडी, सायने, पाडळदे, सडगाव, वेल्हाणे, लळींग, शिरधाणे प्र.नेर, कुंडाणे तांडा, निमखेडी, वणी बुद्रूक, सावळदे, सोनेवाडी, लोहगड, बिलाडी, लोणखेडी, पुरमेपाडा, बल्हाणे, मोरदड, चौगाव, अजंग येथे काँग्रेसने विजय मिळविला. तसेच काँग्रेस- राष्ट्रवादी- शिवसेनेच्या महाआघाडीने बोरीस, उडाणे, नवलाणे, अजनाळे, सावळी येथे ग्रामपंचायत ताब्यात घेतल्याचे जवाहर गटाने सांगितले. माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार पाटील, बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दरबारसिंग गिरासे, बाजीराव पाटील, गुणवंत देवरे, बाजार समितीचे उपसभापती रितेश पाटील, पंचायत समितीचे गट नेते पंढरीनाथ पाटील, अशोक सुडके, बापू खैरनार, गणेश गर्दे, हर्षल साळुंके आदींच्या उपस्थित विजयी सदस्यांचा सत्कार झाला. 


राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दावा 
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष किरण पाटील यांनी पत्रकाव्दारे सांगितले, की नवलाणे, अजनाळे, आंबोडे, नांद्रे, निकुंभे, लोणखेडी- रामी, मोराणे, भिरडई- भिरडाणे- पिंपळखेड ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने स्पष्ट बहुमत मिळविले. कापडणे, निमखेडी, वणी, शिरूड, लोहगड, पाडली, खेडे, चौगांव, बेंद्रेपाडा, उडाणे, चिंचखेडे, अजंग, पुरमेपाडा, आमदड चिंचवार आदी ठिकाणी राष्ट्रवादीने निर्णायक जागी विजय मिळविला. अनेक ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. विजयी सदस्यांसमवेत पाटीलव्दयींसह धुळे तालुकाध्यक्ष राजेंद्र चितोडकर, सुनील नेरकर, मिना सूर्यवंशी, महेंद्र भामरे, विनोद बच्छाव यांनी आनंदोत्सव साजरा केला. 

शिवसेनेचा दावा 
धुळे तालुक्यात २०, तर साक्री तालुक्यात १७ ग्रामपंचायतींवर भगवा फडकल्याची माहिती जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी पत्रकाव्दारे दिली. खासदार संजय राऊत, पालकमंत्री अब्दुल सत्तार, समन्वयक रवींद्र मिर्लेकर, संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. माळी, आमदार मंजुळा गावीत यांनी निवडणुकीबाबत अचूक नियोजन केले. धुळे तालुक्यात बोरीस, सावळी तांडा, खोरदड, बेंद्रेपाडा, 
दोंदवाड, आनंदखेडे, खंडलाय खुर्द, अजनाडे, वडगाव, नांद्रे, उडाणे, देऊर, खुर्द, पुरमेपाडा, मोरदड, रामी, आमदड, बोरविहिर, अकलाड- मोराणे, विसरणे तसेच साक्री तालुक्यात म्हसदी, धमनार, बेहेड, विटाई, दिघावे, खुडाणे, भागपूर, सातरपाडा, गरताड, दारखेल, निलगव्हाण, मलांजन, मावजीपाडा, बोरखिडकी, नवापाडा, कुत्तरमारे, भोरटीपाडा येथे शिवसेनेने विजय मिळविला असून एकूण २२५ सदस्य निवडून आल्याचे श्री. माळी यांनी सांगितले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे