गोगापूर येथे समुह नेता सक्षमीकरण प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 January 2020

शहादा: शहादा तालुक्यातील ३० गावांमध्ये गाव विकासाच्या प्रक्रियेत सहभाग घेणाऱ्या व समाजाला जागृत करणाऱ्या समुदाय नेत्यांची बांधणी करणे तसेच जनता व शासन यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे कार्य सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून गोगापूर (ता. शहादा) येथे लोकमंचाच्या सामुदायिक नेत्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शहादा: शहादा तालुक्यातील ३० गावांमध्ये गाव विकासाच्या प्रक्रियेत सहभाग घेणाऱ्या व समाजाला जागृत करणाऱ्या समुदाय नेत्यांची बांधणी करणे तसेच जनता व शासन यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे कार्य सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून गोगापूर (ता. शहादा) येथे लोकमंचाच्या सामुदायिक नेत्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

प्रशिक्षक म्हणून विचारधारा फाउंडेशनचे संचालक तात्याजी पवार उपस्थित होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व वीर एकलव्य यांच्या प्रतिमांचे पूजन करून भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी प्रशिक्षणात गटचर्चा , खेळ, गाणी व विविध उदाहरणे देऊन भारतीय संविधानाचा सारांश असलेल्या प्रास्ताविकातील स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय तसेच उपासना, श्रद्धा, सर्वधर्म समभाव, सार्वभौम, अधिकृत, अधिनियमित, स्वतःप्रत व अर्पण त्याचप्रमाणे दर्जाची व संधीची समानता आणि गणराज्य, समाजवादी आदी शब्दांचे अर्थ स्पष्ट करून या प्रत्येक शब्दाला भारतीय संविधानात असलेले महत्त्व स्पष्ट केले.
गटचर्चा व खेळाच्या माध्यमातून सामुदायिक नेत्यांना समता, बंधुता, संधीची समानता व लोकशाही इत्यादी मूल्यांची जाणीव करून देण्यात आली.

धडगाव येथील बालिका विद्यालयात शिक्षणात लिंग समानतावर कार्यशाळा

समुदाय नेत्यांनी गटचर्चा करून संविधानाच्या प्रास्ताविकेतील कठीण शब्दांची यादी तयार केली व प्रशिक्षकांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून प्रत्येक शब्दाचा अर्थ स्पष्ट केला.

आयुष्यात प्रथमच संविधानाचा खरा अर्थ समजला असल्याच्या प्रतिक्रिया समुदाय नेत्यांनी व्यक्त केल्या आणि पुन्हा पुन्हा अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन विचारधारा फाउंडेशन ने करावे. अशी मागणीही केली. त्याचप्रमाणे समुदाय नेत्यांनी आदिवासी समाजाच्या विकासाबद्दल मनोगते व्यक्त केले.

यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती ठगीबाई वसावे व आदिवासी एकता परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते भिमसिंग पवार यांनीही समुदाय नेत्यांना समाजात एकजूट घडवून आणण्याबाबत मार्गदर्शन केले.शिबिरात शहादा तालुक्यातील तीस गावातील सुमारे ऐंशी महिला व पुरुष समुदाय नेते सहभागी झाले होते.

जवाहर सूतगिरणीने आणली कामगारांच्या जीवनात समृद्धी

शिबिराच्या यशस्वितेसाठी गोगापूर ग्राम पंचायतीचे सरपंच व सदस्य तसेच जि.प. मराठी शाळेचा शिक्षक, आदिवासी युवा मंडळाचे सदस्य, बचत गटातील महिलांचे विशेष सहकार्य लाभले.

शिबिराचे संयोजन श्यामलाल भील, रवींद्र ठाकरे व नलिनी पवार यांनी केले. विलास अहिरे यांनी सूत्रसंचालन केले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Group Leader Empowerment Training at Gogapur