जवाहर सूतगिरणीने आणली कामगारांच्या जीवनात समृद्धी

Jawahar cotton mill brings prosperity to the lives of workers
Jawahar cotton mill brings prosperity to the lives of workers

धुळेः प्रामाणिक आणि निष्ठेने कष्ट करणाऱ्या कामगारांच्या जीवनात जवाहर सूतगिरणीमुळे समृद्धी आली. कामगारांची मुलेही अधिकारी, इंजिनिअर, डॉक्टर झाली. काही जण परदेशात नोकरी करीत असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा जवाहर सहकारी सूतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष रोहिदास पाटील यांनी केले.

मोराणे येथील जवाहर सूतगिरणीत प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री. पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन तसेच 2018-19 या आर्थिक वर्षात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या 30 कामगारांचा गौरव झाला, त्या वेळी ते बोलत होते. सूतगिरणीचे उपाध्यक्ष प्रमोद जैन, संचालक एस. एम. पाटील, गोकुळ पाटील यांच्यासह कर्मचारी, कामगार उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, की कामगार, शेतकरी सभासद आणि संचालकांच्या परिश्रमांमुळे सूतगिरणीच्या प्रगतीत भरभराट आली. अनेक राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील पारितोषिकेही मिळवली. मोठ्या प्रमाणात नफा कमवून शेतकरी व कामगारांना चांगला मोबदला दिला. शासनाचे कर्ज नियमित फेडून नियमित आयकर भरणारी जवाहर सूतगिरणी एकमेव संस्था आहे. राज्यातील इतर सूतगिरण्यांपेक्षा जवाहर सूतगिरणीने कामगारांना सर्वाधिक वेतन आणि बोनसही दिला. त्यामुळे कामगार आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊ शकले. परिणामी कामगारांचे अनेक पाल्य उच्च पदावर पोहोचले.

सूतगिरणीच्या सुवर्णकाळात कामगारांनी परिश्रम घेतले; तसेच कठीण प्रसंगांतही व्यवस्थापनाच्या कठोर निर्णयाचे स्वागत करून सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. श्री. जैन यांनी जास्तीत जास्त कामगारांनी कामावर हजर राहून उत्पादन वाढीत योगदान देण्याचे आवाहन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com