Dhule Crime : धुळे-अमळनेर मार्गावरून होणारी तस्करी रोखली; पावणेतीन लाखांचा गुटखा जप्त

Dhule Crime : धुळे-अमळनेर मार्गावरून होणारी तस्करी रोखली; पावणेतीन लाखांचा गुटखा जप्त

Dhule Crime : धुळे-अमळनेर मार्गावरून मध्य प्रदेशातील एका वाहनातून होणारी गुटख्याची तस्करी धुळे तालुका पोलिसांनी रोखली.

या कारवाईत पाच लाखांच्या पिक-अप वाहनासह पावणेतीन लाखांचा प्रतिबंधित गुटखा, असा एकूण सात लाख ७४ हजार ५६० किमतीचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. या प्रकरणी चालक-मालकावर गुन्ह्या दाखल झाला. (Gutkha worth 2 lakh seized dhule crime news)

तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद पाटील यांना मध्य प्रदेशातील पिक-अप वाहनातून (एमपी १२, जीए २०८६) गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. याअनुषंगाने निरीक्षक पाटील यांनी पथकास कारवाईची सूचना दिली.

त्यानुसार धुळे-अमळनेर मार्गावर पथकाने पाळत ठेवली. पिक-अप वाहन येताच ते थांबवून चालकाकडे चौकशी केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पथकाने या वाहनाची तपासणी केली. तीत एक हजार २४८ प्रतिबंधित गुटख्याची पाकिटे मिळून आली.

बाजारभावाप्रमाणे मुद्देमालाची किंमत दोन लाख ७४ हजार ५६० आहे. पिकअप वाहनचालक, मालकासह तालुका पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तेथे पंचनामा करण्यात आला.

Dhule Crime : धुळे-अमळनेर मार्गावरून होणारी तस्करी रोखली; पावणेतीन लाखांचा गुटखा जप्त
Dhule Bribe Crime : ‘तहसील’मधील खासगी पंटर रितेश ‘एसीबी’च्या ताब्यात

चौकशीत वाहनचालक इरफान शब्बीर हुसैन तेली (वय २६, रा. कहारवाडी, जि. खंडवा), वाहनमालक बळिराम तुळशीराम कांदे (रा. इंदूर नाका, खंडवा) ही नावे निष्पन्न झाली.

या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे अन्नसुरक्षा अधिकारी अनिल पवार यांच्या फिर्यादीनुसार दोघा संशयितांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, दीपक धनवटे, कुणाल पानपाटील, उमेश पवार, विशाल पाटील, नितीन चव्हाण या पथकाने कारवाई केली.

Dhule Crime : धुळे-अमळनेर मार्गावरून होणारी तस्करी रोखली; पावणेतीन लाखांचा गुटखा जप्त
Pune Crime : बनावट शस्त्र परवान्यातून नोकरी मिळवणाऱ्या आठ सुरक्षारक्षकांना केली अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com