
Dhule News : 5 लाखांसाठी विवाहितेचा छळ
शिरपूर (जि. धुळे) : व्याहीकडून घेतलेले पाच लाख रुपये परत न करता ट्रॅक्टर व ट्रॉलीसाठी आणखी पाच लाख रुपये द्यावेत अशी मागणी करून सुनेचा छळ केल्याच्या संशयावरून
एरंडोल (जि. जळगाव) येथील सहा जणांविरोधात थाळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Harassment of married for 5 lakhs dhule crime news)
हिसाळे (ता. शिरपूर) येथील माहेर असलेल्या ३१ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचा विवाह समीर सलीम पिंजारी याच्याशी झाला आहे. लग्नाला सहा महिने उलटल्यानंतर पैशांची गरज भासल्याने पिंजारी कुटुंबाने तिच्या वडिलांकडून पाच लाख रुपयांची मदत घेतली.
मात्र, ते पैसे परत केले नाहीत. ट्रॅक्टर व ट्रॉली विकत घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये अशी मागणी त्यांनी केली. मात्र पैशांची पूर्तता झाली नाही. त्यामुळे तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
तिच्या अंगावरील दागिने काढून गहाण ठेवले. तिच्या फिर्यादीवरून संशयित पती समीर पिंजारी, सासरा सलीम पिंजारी, सासू शहनाज पिंजारी, दीर वसीम पिंजारी, नणंद रूबिया पिंजारी, नंदोई मोहसीन पिंजारी (सर्व रा. एरंडोल) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस नाईक रामोळे तपास करीत आहेत.