Gram Panchayat Election : शाळा- महाविद्यालये अन् आस्थापनांना सुटी जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gram panchayat election

Gram Panchayat Election : शाळा- महाविद्यालये अन् आस्थापनांना सुटी जाहीर

नंदुरबार : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील १८, अक्कलकुवा तालुका ३१, अक्राणी तालुका ४७, तळोदा तालुका एक, शहादा तालुका दहा, नवापूर तालुक्यातील १६ अशा एकूण १२३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी (ता. १८) मतदान होणार आहे.

हेही वाचा: संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या मतदान अधिकारी, कर्मचारी यांना मतदान साहित्य घेऊन जाण्यासाठी शनिवारी (ता. १७) रवाना करण्यात येणार असल्यामुळे निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींच्या स्थानिक संस्थेच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयास १७ व १८ डिसेंबर या दोन्ही दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसेच निवडणूक क्षेत्रातील सर्व दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेले, खाद्यगृहे, व्यापार, औद्योगिक

हेही वाचा: Gram Panchayat Election 2022 : सरपंच व्हायचंय तर कर खर्च!

उपक्रम किंवा आस्थापनांमधील मतदार, कामगारांना १८ डिसेंबरला मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता भरपगारी सुटी जाहीर करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत.

हेही वाचा: Gram Panchayat Election : ग्रामपंचायत प्रचार सभेत भाजप आमदारांच्या सभेत गोंधळ