Nandurbar News : तळोद्यात मोफत पक्षी चिकित्सालयाचे उद्‍घाटन; ‘पक्षी वाचवा, पर्यावरण टिकवा’ अभियान

तळोद्यातील सहयोग सोशल ग्रुपतर्फे या वर्षीदेखील मकरसंक्रांतीच्या पर्वात ‘पक्षी वाचवा पर्यावरण टिकवा’ या अभियानांतर्गत मोफत पक्षी चिकित्सालय उघडण्यात आले आहे.
Dignitaries present at the inauguration of the bird clinic and members of the collaboration social group.
Dignitaries present at the inauguration of the bird clinic and members of the collaboration social group.esakal

Nandurbar News : तळोद्यातील सहयोग सोशल ग्रुपतर्फे या वर्षीदेखील मकरसंक्रांतीच्या पर्वात ‘पक्षी वाचवा पर्यावरण टिकवा’ या अभियानांतर्गत मोफत पक्षी चिकित्सालय उघडण्यात आले आहे.

चिकित्सालयाचे उद्‍घाटन शनिवारी (ता. १३) मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले असून, जखमी पक्ष्यांना पक्षी चिकित्सालयात घेऊन येण्याचे आवाहन सहयोग सोशल ग्रुपने केले आहे. (Inauguration of free bird clinic in Taloda nandurbar news)

मकरसंक्रांतीच्या पर्वात पतंग उडविण्यासाठी नागरिक अनेकदा घातक अशा नायलॉन अथवा चायना मांजा यांचा वापर करतात. मात्र या धाग्यामुळे मोठ्या प्रमाणात आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना इजा होते. काही वेळा तर पक्ष्यांना आपला जीवदेखील गमवावा लागतो. हे लक्षात घेऊन येथील सहयोग सोशल ग्रुप यांच्याद्वारे दर वर्षी मकरसंक्रांतीच्या पर्वात मोफत पक्षी चिकित्सालय हा अनोखा उपक्रम राबविला जातो.

त्यानुसार या वर्षीही सहयोग सोशल ग्रुपतर्फे पक्षी वाचवा पर्यावरण टिकवा या अभियानांतर्गत १३ ते १५ जानेवारीपर्यंत कॉलेज रोडवरील डॉ. योगेश बडगुजर यांच्या दवाखान्याजवळ तात्पुरते पक्षी चिकित्सालय उघडण्यात आले असून, त्याचा प्रारंभ शनिवारी करण्यात आला. चिकित्सालयाचे उद्‍घाटन तळोदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष ॲड. अल्पेश जैन, डॉ. योगेश बडगुजर, महेंद्र सूर्यवंशी, महाराष्ट्र ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश मगरे, उपाध्यक्ष कीर्तिकुमार शहा, सचिव अशोक सूर्यवंशी, पंडित भामरे, रमेशकुमार भाट, राजाराम राणे, मयूर तुरखिया, हेतन शहा, वसंत वळवी, चेतन शर्मा, नितीन पाटील आदी उपस्थित होते.

Dignitaries present at the inauguration of the bird clinic and members of the collaboration social group.
Nandurbar News : महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी मदत : डॉ. विजयकुमार गावित

दरम्यान, पक्ष्यांना या काळात तातडीने योग्य औषधोपचार मिळवून त्यांचे प्राण वाचविणे व पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने तात्पुरते पक्षी चिकित्सालय शहराच्या मध्यवर्ती भागात कार्यान्वित करणे हा एक माणुसकीचा भाग असून, हे कार्य सहयोग सोशल ग्रुप या सेवाभावी सामाजिक संघटनेकडून दर वर्षी करण्यात येते.

या वर्षी हे चिकित्सालय सुरू करून हे कार्य पुढे नेत असल्याबद्दल पर्यावरणप्रेमींकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पतंग उत्सवात पक्षी जखमी झाल्यास त्यांना औषधोपचारासाठी पक्षी चिकित्सालयात आणण्याचे आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयाचे डॉ. डी. एस. गावित, डॉ. राजेश पावरा, डॉ. ओंकार पाडवी, डॉ. बनकर पाडवी, डॉ. लोकेश पाटील, डॉ. योगेश बडगुजर यांचे सहकार्य लाभले.

''सहयोग सोशल ग्रुपतर्फे तात्पुरत्या स्वरूपात पक्षी चिकित्सालय उभारण्यात आले आहे, हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून, पतंगोत्सवात जखमी पक्षांसाठी हा वरदान ठरणार आहे. पतंग उडविताना युवकांनी पक्षी जखमी होणार नाही, कोणाला इजा होणार नाही यादृष्टीने खबरदारी घेतल्यास निश्चितच पक्षी जखमी होणार नाहीत. तसेच घातक अशा नायलॉन मांजाचा कोणीही उपयोग करू नये.''-राहुलकुमार पवार, पोलिस निरीक्षक, तळोदा

Dignitaries present at the inauguration of the bird clinic and members of the collaboration social group.
Nandurbar News : तळोद्यात टॅक्सी बंद ठेवून ‘हिट ॲन्ड रन’विरोधात आंदोलन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com