Dhule Crime News : तरुणाईची पावले गुन्हेगारी जगताकडे!

youth burglary
youth burglary esakal

पिंपळनेर (जि. धुळे) : शहरातील तरुणांमध्ये (Youth) गुन्हेगारीत वाढते प्रमाण असून, घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यात तरुण टोळी पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली. मात्र मुख्य आरोपी फरारी झाला.

या टोळीकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम व मोबाईलसह गुन्ह्यातील ७१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.(increasing rate of crime among youth youth gang was caught by police in crime of burglary theft dhule crime news)

पिंपळनेर पोलिसांनी ही कामगिरी केली. घटनेवरून पालकांनी वेळीच आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होताना दिसून येत आहे.

ऐशोरामी जीवन जगण्याच्या स्वप्नात असलेल्या तरुणाईची पावले दिवसेंदिवस गुन्हेगारी जगताकडे ओढली जात असल्याचे गेल्या काही दिवसांपासून शहरात दिसून येत आहे. आतापर्यंत पोलिसांनी विविध गुन्ह्यांत अटक केलेल्या गुन्हेगारांमध्ये १८ ते २५ वर्षे वयोगटातील मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

काही बालगुन्हेगार असल्याचेही निष्पन्न झाले आहे. शिक्षण व कामधंद्यांकडे दुर्लक्ष करून ही तरुणाई गुन्हेगारी जगताकडे का वळत आहे, हे शोधून तरुणाईचे प्रबोधन होणे गरजेचे वाटू लागले आहे.

गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरी, सोनसाखळी चोरी, घडफोड्या या प्रकारच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली आहे. पूर्वी शहरी भागात ही प्रवृती दिसून येत होती. मात्र आता तिची बीजे ग्रामीण भागातही खोलवर रुतली जात आहेत.

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

youth burglary
Yatrotsav : साडेसाती मुक्तीपीठ शनिमांडळ येथे शनी अमावस्या यात्रोत्सवात भाविकांच्या रांगा

शहरी भागातील विद्यार्थ्यांचे झकपक राहणीमान, पॉकेटमनी, महागड्या दुचाकींचा वापर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हवाहवासा वाटू लागल्याने त्यांची पावले गुन्हेगारी जगताकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. शहरी भागातील पोचलेला गुन्हेगार त्यांचा वापर करून घेत स्वतःचे गुन्हेगारी विश्व मजबूत करताना दिसत आहे.

मात्र सर्वसामान्य जनतेला या गुन्हेगारी प्रवृत्तीचा त्रास होऊनही निमूटपणे सहन करावा लागत आहे. या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पिंपळनेरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे यांनी चांगलीच कंबर कसली आहे.

काही महिने व दिवसांपूर्वी शहरातील राजे संभाजीनगर, बालाजीनगर, सामोडे शिवारात बंद घराच्यामागील दरवाजाचे कुलूप तोडून घरफोडी केल्याने पिंपळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अनुषंगाने पिंपळनेर पोलिसांनी चक्रे फिरवीत शहरातील घरफोडी करणारी तरुण टोळी जोरबंद केली.

यात शहरातीलच विवेक बच्छाव (वय १९), प्रथम नगरकर (वय १८) यांच्या सोबत दोन विधिसंघर्षित बालके अडकली आहेत. हे घरफोडी, चोऱ्या करीत असल्याबाबत खबऱ्यामार्फत विश्वसनीय व खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्याआधारे त्यांना ताब्यात घेतले.

youth burglary
Nashik Crime News: पांगरी येथे 40 हजारांचा गुटखा जप्त; जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई

त्यांना विश्वासात घेऊन दाखल घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यांबाबत सखोल चौकशी केली असता त्यांनी आमचा मुख्य साथीदार शहरातील फरारी नितीन ऊर्फ राजूभाई पवार (१९) हा असून, तो दिवसभरात कॉलनी परिसरात फिरून बंद घरांची रेकी करतो व तो सांगेल त्याप्रमाणे आम्ही सोबत राहून चोरी करीत होतो, अशी कबुली दिली.

दोन विधिसंघर्षित बालकांना बालसुधारगृहात पाठविले असून, विवेक बच्छाव, प्रथम नगरकर या दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम व मोबाईलसह गुन्ह्यातील ७१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल पिंपळनेर पोलिसांनी हस्तगत केला आहे. यापूर्वीही पिंपळनेर पोलिसांनी इतर गुन्ह्यांमध्ये विधिसंघर्षित व तरुणांना अटक केली होती.

यांनी केली कारवाई

ही कामगिरी पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे, अशोक पवार, हवालदार कांतिलाल अहिरे, विजय पाटील, हेमंत पाटोळे, प्रदीप ठाकरे, प्रकाश मालचे, पंकज वाघ, दावल सैंदाणे, नरेंद्र परदेशी, रवींद्र सूर्यवंशी यांनी केली.

youth burglary
Nashik News : रामतीर्थात मोठ्या प्रमाणावर अस्थी पडून - देवांग जानी

पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या करणाऱ्या टोळ्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या गुन्ह्यांत अल्पवयीन मुलांना विविध आमिष दाखवून त्यांचा गुन्ह्यासाठी वापर करण्यात येत असल्याचा समान धागा आहे.

याआधीदेखील पिंपळनेर पोलिसांनी अल्पवयीन मुलांच्या रोजच्या हालचालींवर पालकांनी लक्ष ठेवून ते चुकीच्या मार्गाला जाणार नाहीत याबाबत सावध राहण्याबाबत आवाहन तसेच प्रबोधन केले होते.

मुलांना भरकटवणाऱ्या चोरट्यांचा पोलिस बंदोबस्त करत आहे, मात्र पालकांनी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक संस्था यांनीदेखील अल्पवयीन मुलांचे धोक्यात असणारे भविष्य सावरण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. बंद घराबाबत रेकी करणारे संशयित आढळल्यास तत्काळ पिंपळनेर पोलिसांशी संपर्क साधावा.-सचिन साळुंखे, सहाय्यक पोलिस निरीक्षक

youth burglary
Dhule News : मध्य प्रदेशातील दुचाकीचोर गजाआड; LCBची कामगिरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com