Indore-Amalner bus accident : विरदेल येथील तरूणाचा अपघातात मृत्यू | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Late Vishal Behre

Indore-Amalner bus accident : विरदेल येथील तरूणाचा अपघातात मृत्यू

चिमठाणे (जि. धुळे) : अमळनेर-इंदूर बस सोमवारी (ता. १८) सकाळी दहाच्या सुमारास खलगाट (मध्य प्रदेश) येथील पुलावरून नर्मदा नदीत कोसळली (Bus Accident). या अपघातात वीरदेल (ता. शिंदखेडा) येथील ३३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.

विशाल सतीश बेहरे (वय ३३) असे मृत तरुणाचे नाव आहे. विशाल बेहरे मध्य प्रदेशात नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे. सोमवारी सकाळी ते वीरदेल गावी अमळनेर बसने येत असताना, खलगाटजवळ नदीत बस कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. (Indore Amalner bus accident Youth from Girl dies in accident dhule Latest Marathi News)

हेही वाचा: मिश्रा बंधूंचे कारनामे आयजींच्या कानी! पोलिसांनीच लॉकअपमध्ये पेग पाजल्याचा आरोप

ते घरात एकटे व दोन बहिणी आहेत. बायोटेक्निल विज्ञानमधून पदवी मिळवून त्यांचे एमबीएपर्यंत शिक्षण झाले होते. ते मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने अपघाताचे समजताच गावात शोककळा पसरली.

दरम्यान, विशाल बेहरे यांचा मृतदेह शिरपूरचे प्रांताधिकारी प्रमोद भामरे, शिरपूरचे तहसीलदार आबा महाजन, अमळनेरचे तहसीलदार मिलिंद वाघ व एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला. सोमवारी (ता. १८) रात्रभर विशालचा मृतदेह शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी प्रमोद भामरे यांनी सांगितले.

हेही वाचा: जळगाव : उपचारादरम्यान ‘त्या’ मयत वृद्धेची पटली ओळख

Web Title: Indore Amalner Bus Accident Youth From Girl Dies In Accident Dhule Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :DhuleAccident Death News
go to top