International Mallakhamb Day : तळोदा तालुक्यातील ‘अनमोल रत्न’; अनमोलची मलखांबामध्ये भरारी

international mallakhamb day Anmol Padavi is promoting and propagating Mallakhamb nandurbar news
international mallakhamb day Anmol Padavi is promoting and propagating Mallakhamb nandurbar newsesakal

International Mallakhamb Day : अस्सल देशी व शरीराला बळकटी देणाऱ्या मलखांब या क्रीडाप्रकाराला पुनरुज्जीवित करीत, या खेळातील चपळता, लवचिकता व त्यातील थरार सातपुड्याच्या कान्याकोपऱ्यात पोचविण्याचे काम अनमोल पाडवी हा एकवीसवर्षीय युवक करीत आहे. (international mallakhamb day Anmol Padavi is promoting and propagating Mallakhamb nandurbar news)

अनमोल नावाप्रमाणेच अनमोल असून, त्याने लहान वयात विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करीत, परिसरातील शेकडो मुलांमध्ये मलखांबाची आवड निर्माण केली आहे. त्याची ही कामगिरी बघून त्याला महाराष्ट्र शासनाने ‘आदिवासी रत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

मलखांब या खेळाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी १५ जून हा जागतिक मलखांब दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सोरापाडा (ता. तळोदा) येथील अनमोल पाडवी हा एकवीसवर्षीय युवक सातपुड्याच्या परिसरात मलखांबाचा प्रचार व प्रसार करीत आहे. अनमोल पथराई येथील के. डी. गावित सैनिकी विद्यालयात आठवीत असताना, शिक्षक शांताराम मंडाले व वडील रवींद्र पाडवी यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने मलखांबाचे प्रशिक्षण घेऊ लागला.

हळूहळू मलखांबाच्या सरावासोबतच मलखांबावर विविध योगाचे प्रकार करू लागला. नियमित सराव केल्याने त्याला मलखांबामध्ये विशेष आवड निर्माण झाली. त्यामुळे तो तासन्‌ तास मलखांबाचा सराव करू लागला. अल्पावधीतच अथक परिश्रम व जिद्दीच्या जोरावर मलखांब या क्रीडाप्रकारात त्याने विभागीय, राज्य स्पर्धेत पारितोषिके मिळविली आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

international mallakhamb day Anmol Padavi is promoting and propagating Mallakhamb nandurbar news
Sports Job : नोकरी शोधणाऱ्या खेळाडूंसाठी आनंदाची बातमी ! SAIमध्ये भरती

मलखांब इतरांनादेखील यावे यासाठी तळोद्यातील प्राचार्य भाईसाहेब गो. हु. महाजन न्यू हायस्कूल येथे अकरावीचे शिक्षण घेत असताना त्याने शाळेतील व शहरातील इतर मुलांना प्रशिक्षण दिले.

तसेच आमलाड येथील आदिवासी शासकीय वसतिगृहात राहत असताना वसतिगृहातील मुलांनादेखील मलखांबाचे धडे दिले आहेत. त्याने मलखांबामध्ये स्वतः प्रावीण्य मिळवीत इतर मुलांनादेखील निपुण केले आहे.

त्याने मलखांबासोबतच योगा, एरियल मलखांब, जिम्नॅस्टिक, एरियल स्पोर्टस या क्रीडाप्रकारांमध्येदेखील उल्लेखनीय कामगिरी बजावत इतरांना प्रेरणा दिली आहे. सातपुड्यातील मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी त्याने बिरसा मुंडा स्पोर्टस अॅकॅडमीची स्थापना केली असून, आजपर्यंत या अॅकॅडमीच्या माध्यमातून सातपुड्याच्या परिसरातील तब्बल दीडशेपेक्षा अधिक मुलांनी मलखांबाचे प्रशिक्षण घेतले आहे. अनमोल हा नावाप्रमाणेच अनमोल असून, इतक्या कमी वयात तो सातपुड्याच्या दुर्गम भागातील हिऱ्यांना मलखांबाचे ज्ञान देत त्यांना पैलू पाडण्याचे काम करीत आहे.

international mallakhamb day Anmol Padavi is promoting and propagating Mallakhamb nandurbar news
Topless Sports league: 'या' अनोख्या स्पोर्ट्स लीगची चर्चा! नक्की काय आहे स्पर्धा, जाणून घ्या

आदिवासी रत्न पुरस्कार

अनमोल पाडवीने लहान वयात व कमी कालावधीत मलखांबामध्ये विशेष प्रावीण्य मिळविले. तसेच आदिवासी मुलांमध्येदेखील या खेळाबाबत रुची निर्माण करीत त्यांना मलखांबाचे धडे दिले. त्यामुळे त्याची विशेष कामगिरी लक्षात घेता, आदिवासी विकास विभागामार्फत महाराष्ट्र शासनाच्या ‘आदिवासी रत्न’ पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आले आहे.

अनमोलची कामगिरी

ृ-पुणे, रायगड, धुळे येथे झालेल्या मिनी, सबज्युनिअर, ज्युनिअर व सीनिअर राज्य मलखांब अजिंक्यपद व निवड स्पर्धेत सहभाग घेत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.-२०२२-२३ मध्ये इंटर झोन स्पर्धेत सहभाग.

-विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.

"मलखांब हा प्राचीन व शरीर पिळदार बनविणारा खेळ आहे. मलखांबावरील कसरतींमुळे शारीरिक सुदृढता, लवचिकपणा, चपळता, संतुलन, साहस आदी गुण वाढीस लागतात. या क्रीडाप्रकाराचा संपूर्ण जिल्ह्यात प्रचार व प्रसार करायला आवडेल." -अनमोल पाडवी, मलखांब खेळाडू व प्रशिक्षक

international mallakhamb day Anmol Padavi is promoting and propagating Mallakhamb nandurbar news
Sports News : 'या' शहरात होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचं 'स्पोर्टस् क्लब'; स्टेडियमवर होणार आयपीएलचे सामने?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com