ऑनलाईन व्यवसाय विरोधात मोबाईल विक्रेते उतरले रस्त्यावर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

ऑनलाईन व्यवसयाच्या विरोधात गुरूवारी डिस्ट्रीब्यूट करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयाबाहेर जळगाव डिस्ट्रीक मोबाईल रिटेल असोसिएशनतर्फे निर्देशने केली. 

जळगावः मोबाईलच्या मोठ मोठ्या कंपन्या या ऑनलाईन व्यवसाला जास्त भर देत त्यांना जास्त सुविधा देत आहे. त्यामुळे ग्राहक ऑनलाई खरेदीवर जास्त भर देत असल्याने मोबाईलचे रिटेल विक्रेत्यांचे व्यवसाय अडचणीत आले आहे. त्यामुळे ऑनलाईन व्यवसयाच्या विरोधात गुरूवारी डिस्ट्रीब्यूट करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयाबाहेर जळगाव डिस्ट्रीक मोबाईल रिटेल असोसिएशनतर्फे निर्देशने केली. 

ऑल इंडिया मोबाईल रिटेल असोसिएशन (एआयएमआरए) ही नोंदणीकृत संस्था असून या अंतर्गत जळगाव डिस्ट्रीक मोबाईल रिटेल असोसिएशन संस्था आहे. सद्या विविध वेबसाईटवर ऑनलाईन मोबाईल खरेदीला मोठ मोठ्या मोबाईलच्या कंपन्या प्राधान्य देत आहे. ऑनलाईन व्यसायिकांना विविध सवलती तसेच नविन वस्तू त्यांना आधी उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे मोबाईल रिटेल व्यवसियाकांवर याचा मोठा परिणाम पडला आहे. त्यामुळे या विरोधात देशभारात ऑल इंडिया मोबाईल रिटेल असोसिएशनतर्फे आंदोलन सुरू आहे. त्या अंतर्गत गुरूवारी जळगाव शहरात जळगाव डिस्ट्रीक मोबाईल रिटेल असोसिएशनतर्फे पोलन पेठ येथील ड्रिस्ट्रीब्यूटर कार्यालयाबाहेर तसेच विविध ज्या कंपन्या ऑनलाईन व्यवसायाला प्राधान्य देतात त्यांचा दालनाबाहेर जावून निर्देशने केली. तसेच ज्या प्रमाणे ऑनलाईन सुविधा कंपन्या देतात त्या प्रमाणे रिटेल व्यवसायिकांना सुविधा देणे, ऑनलाईन व्यवहार बंद करणे आदी मागण्या यावेळी व्यवसायिकांनी केल्या. 

आर्वजून पहा : आहो आश्‍चर्यच ना ! शेजारणीने दिला त्रास...अन्‌ बकरी पोहचली पोलिस ठाण्यात 
 

दिडशे व्यवसायीक आंदोलनात 
जिल्ह्यातील सुमारे दिडशे मोबाईल विक्री व्यवसायीक यावेळी आंदोलनात उपस्थित होते. यावेळी ऑफलाईन व्यवसायाला मारू नका अशा आशायाचे पोस्टर निर्देशनात व्यवसायिकांनी झळकावले. 

आर्वजून पहा :  कानात हेडफोन लावला...अन्‌ डॉक्‍टरने केली आत्महत्या !
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news District Mobile Retail Association onlin biznes agince Movement