आहो आश्‍चर्यच ना ! शेजारणीने दिला त्रास...अन्‌ बकरी पोहचली पोलिस ठाण्यात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

असह्य होणारा त्रासाची तक्रार घेवून चक्क बकरीच त्या महिलेची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचल्याने पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना सर्वांना आश्‍चर्याचा धक्का बसला.

जळगाव : शेजारची महिला अंगावर गरम पाणी फेकते...त्याचा असह्य होणारा त्रासाची तक्रार घेवून चक्क बकरीच त्या महिलेची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचल्याने पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना सर्वांना आश्‍चर्याचा धक्का बसला. अशी ही आगळी वेगळी घटना जळगावच्या यावल शहरात घडली. या प्रकरणी संबंधित महिलेवर कारवाई करण्याची मागणी बकरीच्या तक्रारीवरून बकरी मालकाने पोलिसांना केली आहे. 

यावल येथील खाटीक वाड्यात जुबेर दस्तगीर खाटीक यांनी बकऱ्या पाळून उदरनिर्वाह करतात. त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या एका महिलेने अनेकदा बकऱ्यांवर गरम पाणी फेकले. त्यामुळे आतापर्यंत जुबेर यांच्या तीन ते चार बकऱ्या दगावल्या. शेजारील या महिलेच्या या वर्तणाला वैतागून जुबेर यांनी तीन बकऱ्या विकून दिल्या. मात्र, तरीदेखी या महिलेने नाहक बकऱ्यांवर गरम पाणी फेकण्याचा प्रकार सुरूच होता. त्यामुळे वैतगालेला बकरी मालकाने व बकरीच्या गळ्यात या महिलेची विरुध्द तयार केलेली तक्रार बांधून थेट यावल पोलिस ठाणे गाठले. हा प्रकार पाहून यावल पोलिसांमध्ये खळबळ उडाली. 

नक्की पहा : आहो हे काय..."हग डे' ला पोलिसांनी मारली मिठी...!

महिलेवर गुन्हा दाखल करा 
जुबेरने बकरीच्या अंगावर गरम पाणी फेकून त्रास देणाऱ्या महिलेबाबत तक्रार तयार केली. ही माझी तक्रार बकरीच्या वतीने घेवून या संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करून कारवाई करा अशी मागणी तक्रारीतून पोलिसांकडे केली आहे. 

हेपण पहा : कानात हेडफोन लावला...अन्‌ डॉक्‍टरने केली आत्महत्या ! 
 

अन्‌ चर्चेला उधाण 
बकरी मालकाने शेजारील महिलेच्या विरोधात तक्रार बकरीच्या माध्यमातून दिल्याची आगळी वेगळी घटना यावल शहरात घडली. या घटनेची माहिती सर्वत्र पसरल्याने चक्क एक बकरी तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचल्याने परिसरात यावर जोरदार चर्चा सुरु आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yaval marathi news nebar Trouble by Police Complaint Goat

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: