कानात हेडफोन लावला...अन्‌ डॉक्‍टरने केली आत्महत्या ! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

शहरातील हरेश्‍वरनगर येथे भाड्याने खोली करून वास्तव्यास असलेल्या डॉक्‍टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली.

जळगाव : शहरातील हरेश्‍वरनगर येथे भाड्याने खोली करून वास्तव्यास असलेल्या डॉक्‍टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. खोलीचे दार तोडून मित्रांनी त्यांना बाहेर काढत पोलिसांना कळविले. डॉ. विजय नारायण जाधव (वय 24) असे मृताचे नाव आहे. कानात हेडफोन लावलेल्या अवस्थेतच त्यांनी गळफास घेतला आहे. ते मूळ बोरगाव कासारी (ता. सिल्लोड) येथील रहिवासी आहेत. कुटुंबीयांना घटनेची माहिती कळविण्यात आली असून, रात्री उशिरापर्यंत पालक आल्यावर या प्रकरणाचा उलगडा होईल, असे पोलिसांनी सांगितले. 

रिंगरोडवरील हरेश्‍वरनगरात सतीश दामोदर श्रावंगे यांच्या मालकीच्या घरात भाड्याने खोली घेऊन डॉ. विजय नारायण जाधव (वय 24) हे वास्तव्यास होते. साकेगाव वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली होती. तसेच पद्‌व्युत्तर (एम.डी.) शिक्षणासाठी ते तयारी करीत होते. यासोबतच शहरात मंगलमूर्ती क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये नाईट शिफ्टमध्ये काम व इंटर्नशिप करीत होते. बुधवारी दुपारी तीनपासून त्यांच्यासोबत शिक्षण घेणारे मित्र मोबाईलवर संपर्क करत होते. मात्र, फोन का उचलत नाही म्हणून त्यांच्या 

नक्की पहा : आहो हे काय..."हग डे' ला पोलिसांनी मारली मिठी...!
 

मित्रांनी डॉ. गिरीश पाटील यांना कळविल्यावर सायंकाळी डॉ. पाटील रुमवर आले. दार ठोकूनही त्यांना आतून कुठलाच प्रतिसाद येत नसल्याने त्यांनी खिडकीची काच तोडून आत डोकावल्यावर डॉ. विजय गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसत होते. तत्काळ त्यांनी जिल्हापेठ पोलिसांना माहिती कळवून दार तोडले. 
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केल्यावर मृतदेह खाली उतरवण्यात येऊन जिल्हा रुग्णालयात रवाना केला. मृत डॉ. विजय मूळ बोरगाव कासारी (ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) येथील रहिवासी असून 
त्यांच्या पश्‍चात शिक्षक वडील नारायण जाधव, भाऊ, आई असा परिवार आहे. घटनेचे वृत्त कळाल्यावर नातेवाइकांसह कुटुंबीय जळगावच्या दिशेने रवाना झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

आर्वजून पहा : वय अवघे पाच वर्ष अन्‌ नऊ सुवर्ण पदकांची कमाई
 

आत्महत्येचे कारण अस्पष्ट 
डॉ. विजय एकटेच त्या खोलीत राहत होते. त्यांच्या सोबत शिक्षण घेणारे मित्र-मैत्रिणींचे खोलीवर येणे-जाणे असल्याचे मित्रांनी सांगितले. घटना घडल्यावर डॉ. गिरीश पाटील यांच्यासह डॉ. विजय सोबत शिक्षण घेणारे वर्गमित्र, सोबत काम करणारे डॉक्‍टर मित्र-मैत्रिणी पोचल्यावर त्यांना आश्‍चर्याचा धक्का बसून रडू कोसळले. मात्र, आत्महत्या कशामुळे केली असावी, याबाबत कोणालाही काहीच अंदाज वर्तवता आला नाही. खोलीत पोलिसांनीही शोधाशोध केली. मात्र, त्यांनाही कुठलीही सुसाईड नोट आढळून आली नाही. 

हेपण पहा : जळगाव जिल्ह्यातील 361 रेशन दुकानदारांची अनामत जप्त 
 

""घटनास्थळावरून आत्महत्येचे कारण स्पष्ट होईल, असे अद्यापतरी काही मिळू शकले नाही. मात्र, डॉ. विजय जाधव यांनी कानात हेडफोन लावलेला होता. त्यांच्याजवळील ऍड्राईड मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. आकस्मिक मृत्यूची नोंद होऊन तपासात नेमके कारण स्पष्ट होईल. 
अकबर पटेल 
पोलिस निरीक्षक, जिल्हापेठ, जळगाव 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news doctor Suicide news